आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅन काकाना पोलिसांनी पकडले, घरी जायचे कसे?स्कूलबस चालक काय म्हणतात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सकाळचे साडेसात वाजलेले. जुळे सोलापुरातील मेहता प्रशालेसमोर स्कूल बस येऊन थांबते. बसमध्ये बसलेले पहिली, दुसरीचे चिमुकले उतरतात. गाडीत बसलेले पोलिस खाली उतरत नाही. ती बस पुढे नेली जाते अन् विद्यार्थ्यांंमध्ये कुजबूज सुरू होते. व्हॅनच्या काकांना पोलिसांनी पकडून नेले. आता शाळा सुटल्यावर घरी कसे जायचे? एकजण म्हणते, पप्पाला फोन करू. दुसरी म्हणते, काकाच फोन करतील. तिसरी म्हणते, नाही गं काका परत घ्यायला येतील. एक चिमुकली तर रडायलाच लागते. लहान मुलांची ही गोंधळलेली अवस्था बुधवारी पाहायला मिळाली. त्यामुळे पोलिसांनी "अशा रीतीने' कारवाई करावी का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरवर्षी शाळा सुरू झाल्या की आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना जाग येते. नियमांचा बडगा दाखवला जातो. संयुक्त कारवाईचा फार्सही होतो. पण परिणाम मात्र शून्य. रिक्षावाले किंवा व्हॅनवाले विद्यार्थ्यांना कोंबून नेण्याचा प्रकार सुरूच राहतो. विद्यार्थ्यांची सुरक्षा पुढे करून गेल्या वर्षी शाळाशाळांतून शालेय परिवहन समिती स्थापण्यात आल्या. नियम पाळल्याचा देखावा करण्यापलीकडे त्यातून काही साध्य होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सोयीने आणि सवडी निडमांवर बोट ठेवून कारवाई करण्याचा देखावा करण्यापेक्षा पालक आणि व्हॅनचालक यांच्या समस्या समजून घेत मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

जे चालक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे. रस्त्यावर कुठेतरी थांबून बस अडवायची. विद्यार्थ्यांसोबत गाडीत बसून शाळेतपर्यंत यायचे. मुले खाली उतरल्यानंतर चालकाला घेऊन जायचे, या प्रकाराने बालमनावर विपरित परिणाम होऊ शकतो. कारवाई करायची असेेल तर मुले वर्गात गेल्यानंतर वाहनाची तपासणी करावी. चुकीचे अाढळल्यास कारवाई करावी. यामुळे मुलांमध्येही भीती बसणार नाही.
व्हॅनमधून मुले उतरल्यानंतर पोलिसांनी गाडीवर कारवाई केली.

चुकीची कारवाई थांबवतो
स्कूलबसध्ये बारा वर्षाखालील नऊ मुले आणि रिक्षात चार जण पाहिजेत. प्रत्यक्षात उलटे चित्र अाहे. स्कूलबससाठी २८ नियम अाहेत. बसमध्ये मुलगी असेल तर महिला सहायक म्हणून नेमणूक पाहिजे. पालक घराजवळ मुलांना बसमध्ये बसवतात. बस रिक्षामधील दाटणी पाहतात. अापला मुलगा शाळेत सुरक्षित गेला पाहिजे, असे त्यांना का वाटत नाही. अोव्हरसीट वाहतूक का थांबवत नाही. चालकही नियमाप्रमाणे वागल्यास अामचा कारवाईचा प्रश्नच येत नाही. पोलिस यापुढे विद्यार्थ्यांसोबत बसमध्ये बसून येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ही कारवाई चुकीची अाहे. वाहतूक पोलिस अधिकारी अारटीअो पथकाला सूचना देतो. लवकरच सर्वांची एक समन्वमय बैठक घेऊ.'' बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

^मिनीबस स्कूलमध्येकिमान पंधरा विद्यार्थी सहज बसतात. कमी विद्यार्थी घेतल्यास गाडी हप्ता, डिझेल, मेटेनन्स कुटुंबाचा चरितार्थ कसा चालणार. मुले कमी घेतल्यास पालक जास्त पैसे द्यायला तयार होत नाहीत. मुंबई, पुणे येथे हे ठीक अाहे. शालेय वाहतूक समिती, पालक, अारटोअी, पोलिस यांची संयुक्त बैठक व्हावी. शंभर-दोनशे वाढवून मिळाल्यास मुले कमी घेता येतील. स्कूलबससाठी किती दर पाहिजे हे जाहीर करा म्हणून अर्ज दिला अाहे. त्याची अंमलबजावणी झालीच नाही. मुले बसमध्ये असताना पोलिसांनी कारवाई करू नये.'' कुमार काशीद, महाराष्ट्रविद्यार्थी वाहतूक संघ, खजिनदार

कारवाई करण्याआधी पालकांना सूचना द्या
कुणीचुकीचेवागत असल्यास कारवाई करा. पालकांना सूचना द्या. शाळेच्या मुख्याध्यापकांनाही माहिती देण्याचे पोलिसांचे काम अाहे. कायदा हाताळताना जनतेची सुरक्षितताही समजून घ्यावी.'' अॅड. पी. बी. लोंढे-पाटील, पालक

जास्तफी देणे परवडत नाही, मध्यम मार्ग काढा
बसमध्ये कमीमुले घेतल्यास पालकांना जास्त भाडे देणे परवडत नाही. दुष्काळसदृश स्थिती असताना पोलिस आणि अारटीअो यांनी कारवाई मोहिमेत थोडी शिथिलता आणावी. सर्वांचे हित जोपासून मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.'' सोमनाथ घडकुंबे, नागरिक
बातम्या आणखी आहेत...