आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे रूळ न तोडता 4 तासांत बनवला भुयारी मार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -  रेल्वे  रुळाखालून रस्ते वाहतूक व्हावी म्हणून रेल्वे अंडरब्रीजचे काम केले जाते. पूर्वी हे काम करताना सुमारे १५० ते २०० कामगार लागायचे. शिवाय रुळाचे तुकडेदेखील पाडले जायचे. काम पूर्ण झाल्यानंतर वेल्डिंगच्या सहाय्याने जोडले जात.
 
मग त्यावरून रेल्वे वाहतूक सुरू होत. अंडरब्रीजच्या या कामाला सोलापूर रेल्वे प्रशासनाने फाटा देत अभूतपूर्व काम पूर्ण करून दाखवले आहे. तेदेखील अवघ्या चार तासांत. सोलापूर रेल्वे विभागाचे हे काम मध्य रेल्वेतील तर पहिलेच आहे. शिवाय भारतीय रेल्वेत देखील आतापर्यंत या पद्धतीने काम झाले नसल्याचा दावा सोलापूर विभागाने केला आहे.  
 
रेल्वे फाटक कायमस्वरुपी बंद करून त्या ठिकाणी रेल्वे अंडरब्रीज बांधले जाते आहेत. त्या भुयारी मार्गातून रस्ते वाहतूक केली जाते. आतापर्यंत देशात यासाठी कट अँड कव्हर ही पारंपरिक पद्धत वापरली जात. 
 
सोलापूर रेल्वेने मात्र नुकतेच रांजनगाव ते बिसापूरदरम्यान चार तासांचा मेगा ब्लॉक घेतला होता. या दरम्यान रेल्वे फाटक क्रमांक १८ बंद करून त्या ठिकाणी अंडरब्रीजचे काम करण्यात आले. या वेळी प्रशासनाने रुळास साधा धक्का देखील न पोहोचवता पोकलेन व जेसीबीच्या माध्यमातून माती काढून घेतली. 
 
माती काढल्यानंतर सुरक्षितपणे रुळाखाली सिमेंटचे मोठे बॉक्स बसवले. यासाठी सुमारे १०० कामगारांची मदत लागली. अवघ्या चार तासांत दीड कोटी रुपयांचा मार्ग तयार करण्यात आला. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे काम झाले असल्याचा दावा सोलापूर प्रशासनाने केला आहे.
 
१. सर्वप्रथम जेसीबीच्या साहाय्याने रुळावरील खडी व आडवे खांब उखडून काढण्यात आले. 
२. रूळ तसाच ठेवत पोकलेन मशीनच्या साहाय्याने त्याखालील जमीन खोदण्यात आली. 
३. रुळाखाली सिमेंटचे तयार बॉक्स बसवून तत्काळ त्याची जोडणी करण्यात आली. 

याचा फायदा काय
पूर्वी अखंडित रूळ तोडून हे काम करावे लागत होते. नंतर ते वेल्डिंग करत. यामुळे रुळांच्या सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असायची. आता मात्र रूळ अखंड राहत असल्याने सुरक्षितता अबाधित राहिली. तसेच वेल्डिंग नसल्याने रेल्वे गाड्यांना वेग कमी करण्याची गरज नाही. आपल्या निर्धारित वेळेनुसार त्या धावू शकतात.
बातम्या आणखी आहेत...