आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता बहुजनांची; भक्ती छत्रपतींची अन् निजामांची, अनेक पिढ्यांपासून नित्यसेवा सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- तुळजापूरयेथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी सबंध बहुजनांची आई म्हणून ओळखली जाते. मातेचे भाविकच नव्हे तर सर्व सेवेकरी, मानकरी विविध जाती-धर्मातले असल्यामुळे मातेला वेगळे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने साडेतीनशे वर्षांपासून मातेची दररोज नित्यपूजा, नैवेद्य, प्रक्षाळ पूजा केली जाते. तर निजामांचे तत्कालिन पंतप्रधान चंदुलाल यांच्यातर्फे मातेला दोनवेळा नैवेद्य दिला जातो. या परंपरेसाठी दोन्ही राजघराण्यांनी व्यवस्था करून ठेवली आहे.
तुळजाभवानी मातेवर छत्रपती शिवाजी महाराजांची अपार श्रध्दा होती, असे दाखले दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानी मातेच्या भेटीसाठी तुळजापुरात आल्याचा पुरावा आढळत नाही. परंतु, महाराजांनी मातेची सेवा सुरू केल्याचा दाखला उपलब्ध आहे. मूळचे कदम असलेल्या सध्याच्या पाटील घराण्याने मातेच्या मूर्तीचे संरक्षण केल्यामुळे या घराण्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटीलकी बहाल केली होती. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांचे हे पाटील घराणे. महाराजांनी पाटील घराण्याकडे भोसले घराण्यामार्फत देवीची सेवा करण्याचे अधिकार बहाल केले. त्यासाठी सिंदफळ शिवारात ६० एकर जमीन देण्यात आली आहे. राजाची बाग म्हणून ओळख असलेल्या या जमिनीची देखभाल अप्पासाहेब पाटील यांच्यामार्फत होते. या शेतीतील काही भाग वहिताखाली असून, त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून देवीचा अभिषेक, नैवेद्य, प्रक्षाळ पूजेसाठी येणारा खर्च केला जातो.
छत्रपतींच्या कोल्हापूर घराण्याकडून हे व्यवस्थापन चालते. या संस्थानची शहरात जागा असून, या जागेत शिवाजी महाराजांचे पणतू रामराजे लहानपणी म्हणजे १७५० च्या दरम्यान पाच वर्षे वास्तव्यास होते. त्यांचा सांभाळ नारूजी कदम-भोपे यांनी केला होता. छत्रपती घराण्याला देवीची दररोज सेवा करता यावी, यासाठी कोल्हापूरमध्ये देवीचे मंदिर बांधण्यात आले असून, पूजेसाठी तुळजापूरच्या अनंतराव कदमांचे कुटंुब तिथे अनेक पिढ्यांपासून वास्तव्यास आहे. त्यांना भोपेराव असे संबोधले जाते. या पुजाऱ्याला राजघराण्याकडून सन्मान दिला जातो. किंबहुना, जहागिरी देण्यात आली आहे, असे इतिहास संशोधक प्रा. डॉ. सतीश कदम सांगतात. रामराजेंचे वास्तव्य असलेल्या तुळजापुरातील या जागेत संस्थानचे कार्यालय सुरू आहे. त्यासाठी २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना अप्पासाहेब पाटील यांच्याकडून मानधन दिले जाते.

शिवाजी महाराजांच्या दोन गाद्या झाल्यानंतर सातारच्या गादीकडे शिखर शिंगणापूरच्या देवस्थानाची तर कोल्हापूर संस्थानकडे तुळजाभवानीची सेवा करण्याची जबाबदारी आली. ही पूर्वापार सेवा असून, कदाचित शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून सुरू असावी. संस्थानने दिलेल्या जमिनीतून सर्व खर्च भागविला जातो. शहरातील जागेवर धर्मशाळा बांधण्याचा विचार आहे.'' छत्रपतीसंभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे वंशज, कोल्हापूर.

श्री तुळजाभवानी मातेला नैवेद्य घेऊन जात असताना करवीर संस्थानचे कर्मचारी.
तुळजाभवानीच्या दरबारात सगळ्याच जाती-धर्माच्या सेवेकऱ्यांना उचित मान आहे. दररोज दही-दूध पुरविण्याचा मान गवळी समाजाला, नैवेद्यासाठी लागणारे सरपण पुरविण्याचा मान मागासवर्गीय समाजाकडे, स्वयंपाक बनविण्याचा मान मराठ्याकडे, दूध-खीर बनविण्याचा मान कासार समाजाला तर पानाचा विडा देण्याचा मान तांबोळी समाजाला आहे. सनई-चौघडा आणि संबळ वाजवत देवीपर्यंत नैवेद्य पोहोचविण्याचा मान ब्राह्मण समाजाकडे आहे.
ब्राह्मणांपासून तांबोळ्यांपर्यंत सगळ्यांचा मान

अशी आहे नित्यसेवा
कुलस्वामिनीतुळजाभवानी मातेला दररोजचा पहाटे पहिला आणि अखेरचा अभिषेक छत्रपती घराण्याकडून केला जातो. विशेष म्हणजे हा अभिषेक देवीच्या मूर्तीवर केला जातो. उर्वरित अभिषेक मूर्तीच्या पायावरच केले जातात. त्यानंतर वाद्याच्या गजरात मातेला नैवेद्य दिला जातो. करवीर संस्थानचे कर्मचारी पहाटेपासून त्यासाठी तयार असतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, निजामाच्या दिवाणाची देवीभक्ती