आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे 60 उमेदवार झाले निश्चित, 40 जागांवर चर्चा, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दोन दिवस बाकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस हाती असले तरी भाजपची उमेदवार यादी अजून तयार झालेली नाही. बुधवारी रात्री उशिरापर्यंत १०२ पैकी ६० जागांवर उमेदवार निश्चित करण्याबाबत एकमत झाले. प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५, ९, २४, १८ यासह अन्य प्रभागांतील ४२ जागांवर उमेदवार निश्चिती झाली नव्हती. रात्री १२ वाजता पुन्हा बैठक झाली.
 
 भाजपात प्रवेश केलेल्या आरिफ शेख, सुनील कामाठींसह विद्यमान काही नगरसेवकांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. नरेंद्र काळे, सुरेश पाटील, शिवानंद पाटील, संजय कोळी, शोभा बनशेट्टी, पांडुरंग दिड्डी, रोहिणी तडवळकर, इंदिरा कुडक्याल, अविनाश पाटीलसह अन्य नगरसेवकांच्या नावावर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. अाता ४२ जागांवर उमेदवारांबाबत चर्चा करून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख खासदार बनसोडे हे निर्णय घेतील. 
 
यादी आज होणार जाहीर : भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी काेअर कमिटीची बैठक बुधवारी रात्री हॉटेल लोटस येथे पार पडली. प्रत्येक उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. रात्री उशिरा पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, भाजपचे नेते उमा कापरे, रघुनाथ कुलकर्णी यांनी चर्चा केली. त्यानंतर यादी अंतिम तयार करण्यात आली. त्यापैकी पहिली यादी गुरुवारी जाहीर होणार आहे. तर शुक्रवारी सकाळी काही जणांची नावे जाहीर करण्यात येतील. 
 
बातम्या आणखी आहेत...