आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयसिंहांना दिला अखेरचा निरोप, अंत्यसंस्कारास अकलूजला पवारांसह मान्यवरांची हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- शिवरत्न उद्योग समूहाचे अध्यक्ष उदयसिंह मोहिते यांच्यावर गुरुवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता.

उदयसिंह मोहिते यांचे बुधवारी मुंबई येथे उपचार घेताना निधन झाले होते. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. गुरुवारी सकाळपासून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी नऊच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली.

अंत्ययात्रेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार, छत्रपती उदयनराजे भोसले, शिवाजीराव देशमुख आदींनी श्रध्दांजली वाहिली. सकाळी ११.४० च्या सुमारास उदयसिंह यांचे थोरले चिरंजीव कीर्तिध्वजसिंह धाकटे चिरंजीव सरपंच शिवतेजसिंह मोहिते यांनी अग्नी दिला. यावेळी छत्रपती मालोजीराजे भोसले, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, दीपक साळुंखे, आमदार हनुमंत डोळस, नामदेव वाघमारे, मारुती नवले आदींनी श्रद्धांजलीपर भाषणे केली.