आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशी बनावटीच्या पिस्टल, काडतुसांसह आंतरराज्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देगावरोडवरील गरूड बंगल्यासमोरून पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील तिघांना बेकायदेशीर दोन देशी बनावटीचे पिस्टल चार जिवंत काडतुसांसह अटक केली. त्यांचा कोणाशी संबंध आहे, याबाबततपास सुुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
औदुंबर ऊर्फ भय्या लक्ष्मण माने (वय २६, रा. कुरुल, मोहोळ), भीमाशंकर करबसप्पा तळवार (वय ३३, रा. खजुरी, गुलबर्गा), प्रवीण बसवराज स्वामी (वय ३३, रा. उमरगा) अशी तिघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला होता. जुलै रोजी देगाव रोडवरील गरूड बंगल्यासमोर तीन संशयित दिसून आले. पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याच्या बेतात होते. मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल, ७.६५ एम.एम. आकाराची चार जिवंत काडतुसे असा एकूण सुमारे १०,०४०० रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. त्यांच्याकडे कसलाच परवाना नसल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३,५/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई पोलिस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, रणजित माने, रवी परबत, दीपक राऊत, शंकर मुळे, राजेश चव्हाण, शीतल शिवशरण, नाना उबाळे, मंजुनाथ मुत्तनवार, विनायक बर्डे, सागर सरतापे, सचिन होटकर, सागर गुंड, सुहास अर्जुन, सचिन बाबर, दामोदर गजगाटे, राजू राठोड, संजय काकडे, विजय निंबाळकर, पीरजादे, उडाणशिव यांनी केली. 

कर्नाटकातून हत्यारे 
भीमाशंकर तळवार याने कर्नाटकातून ही हत्यारे आणली. प्रवीण स्वामी आणि औदंुबर मानेच्या ओळखीतून विकण्याचा त्याचा प्रयत्न होता. या तिघांवर यापूर्वी गुन्हे नाहीत. तळवार हा शेतकरी, स्वामी हा रिक्षाचालक, माने हा हाॅटेल मालक आहे. बेकायदेशीर हत्यारे विक्रीकरिता आणणे आणि घेणे यामागे नेमके कारण काय आहे, त्यांचा कोणाशी संबंध आहे, याचा शोध सुरू आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...