आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरबीआयचे फर्मान; कामगारांना रोख नको, खात्यावरच पगार द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाचशे,हजारच्या नोटा रद्दनंतर रिझर्व्ह बँकेने असंघटित क्षेत्रातील कामगारांना रोखीने पगार देता त्यांच्या खात्यावरच पगार जमा करावे, ज्यांचे बँकेत खाते नाही, त्यांना खाते उघडून घेण्याचे फर्मान सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांना काढले आहेत. हे आदेश शुक्रवारी रात्री सर्वच बँकांना मिळाले. त्यानुसार शनिवारी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया देना बँकेने शहरात विविध ठिकाणी असंघटित क्षेत्रातील कामगारांची खाते उघडण्यास सुरुवात केली.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी बाळीवेस, बाजार समिती, एनटीपीसी याठिकाणी स्टेट बँकेकडून १८४, न्यू पाच्छा पेठ, औद्योगिक वसाहत, विडी घरकुल येथे बँक ऑफ इंडियाने ६३ तर देना बँकेनेही ४१ खाते उघडली आहेत. रविवारीही इतर बँकांकडून खाते उघडण्यास सुरुवात होईल. याबाबत संबंधित बँकांनाही पत्र देण्यात आले आहेत. नोटा रद्दच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून बँकांना नव-नवीन सूचना येत आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांची खाती उघडण्याबाबतची सूचना शुक्रवारी मिळाली. त्यानुसार शनिवारपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

बाजार समिती, एनटीपीसीमध्येही काऊंटर
असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या लक्षात घेता ही मोहीम महिनाभर चालण्याची शक्यता आहे. शहरामध्ये आज एनटीपीसी, बाजार समिती याठिकाणी स्टेट बँकेने स्वतंत्र काऊंटर उघडून खाती उघडण्याचे काम हाती घेतले. बँक ऑफ इंडियाने कामगार वस्तीमध्ये जाऊन खाते नसलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून अर्ज घेण्यात आले आहेत. सोमवारपासून सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांकडून काऊंटर सुरू करण्यात येणार आहेत.

एसबीआयच्या ३० एटीएममध्ये कोटी : शनिवाररविवार दोन दिवस सुटी असल्याने नागरिकांना अडचणी येऊ नये, यासाठी स्टेट बँकेने शहर, जिल्ह्यातील ३० एटीएममध्ये कोटी रुपयांची रोकड भरली आहे. शनिवारी अंदाजे दीड कोटी रुपये यातील नागरिकांनी काढले आहेत. यामुळे रविवारी पुन्हा गरज पाहून कोटी रुपये भरण्यात येणार असल्याची माहिती बँक अधिकारी श्री. अकोले यांनी दिली.

कामगार आयुक्तांची घेणार मदत
शहरात लाखांपेक्षा अधिक असंघटित क्षेत्रातील कामगार अाहेत. या कामगारांची खाते उघडण्यासाठी सहायक कामगार आयुक्तांची मदत घेण्यात येणार आहे. कामगार आयुक्तांच्या सूचनेनुसार संबंधित ठिकाणी बँकेचे शिबिर सुरू करण्यात येणार आहे. ही मोहीम सोमवारपासून अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी सांगितले.

रिझर्व्ह बँकेने आदेश देताच बँक ऑफ इंडियाच्या वतीने असंघटित कामगारांसाठी खाते उघडण्याचे काम सुरू करण्यात आले. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी कामगार वसाहतीमध्ये जाऊन खाते उघडण्याचे अर्ज भरून घेतले.
बातम्या आणखी आहेत...