आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघोली खून प्रकरणात आणखी एक ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- वाघोलीशिवारातील तरुणीच्या खून प्रकरणाचा छडा लागल्यानंतर आता या प्रकरणातील अनेक आरोपी गळाला लागण्यास प्रारंभ झाला आहे. याप्रकरणी वाघोली येथील एका तरुणालाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गुरुवारी (दि.१६) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी तपास अधिकारी साहाय्यक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे, पोलिस निरीक्षक हरिष खेडकर आदी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले की, मृत कांचन परदेशी ही तरुणी पुणे येथील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून ती बेपत्ता असल्याबाबत जुलै २०१५ मध्ये ठाण्यात मिसिंगची नोंद केलेली आहे. परंतु, वास्तविक पाहता कांचनचे मुख्य आरोपी प्रकाश सूर्यकांत चाफेकर यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही पुणे येथील एकाच आयटी कंपनीत कार्यरत होते. मात्र, यातील चाफेकर हा विवाहित होता. त्याची नागपूर येथे बदली झाली होती. कांचन बेपत्ता झाल्यापासून त्याच्यासोबतच नागपूरला रहात असल्याचीही माहिती समोर येत आहे. परंतु, कांचनने लग्नासाठी प्रकाशच्या मागे तगादा लावल्याचे समोर येत आहे. याचदरम्यान फिरायच्या बहाण्याने कांचनला सोबत घेऊन प्रकाश औरंगाबाद, नांदेड, लातूर मार्गे उस्मानाबाद येथे आला होता. येथे आल्यानंतर गाडी बिघडल्याचा बहाणा करून त्याने वाघोली येथील नातलगाला मित्र असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर उस्मानाबाद- वाघोली मार्गावरच दि. १९ ते २० डिसेंबर २०१५ दरम्यान कांचनवर चाकूने वार करून तसेच गळा चिरून तिची हत्या केली. याप्रकरणी चाफेकरला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली अाहे. या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या वाघोली येथील आणखी एका आरोपीला गुरुवारी ताब्यात घेतल्याचे अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

जयपुरीकुर्तीवरून खुनाचा उलगडा :
मृततरुणीची ओळखच पटत नसल्याने आरोपीला शोधण्याचे आव्हान हाेते. साहाय्यक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी आपल्या पथकाच्या मदतीने तपास सुरू केला. यावेळी तरुणीच्या अंगावर जयपुरी कुर्ता होता. हा कुर्ता बाजारपेठेत उपलब्ध होत नसल्याने त्यांनी जयपुरी कुर्ती या वेबसाईटवर जाऊन कंपनीच्या इमेलवर असे कुर्ती कोणाला विक्री झाल्याची विचारणा केली. यावेळी फ्लीप कार्डवरून अशा कुर्त्यांची मोठी विक्री झाल्याची त्यांचे मोबाइल क्रमांक मिळाले. घटनेदरम्यानच्या कॉल डिटेलशी पडताळणी केल्यानंतर चाफेकरचा क्रमांक त्यावेळी वाघोली परिसरात असल्याचे समोर आले.