आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात स्वतंत्र भाषा संकुल उभारण्यात येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर  -  केवळ मराठी, इंग्रजी, हिंदी म्हणजे भाषा विषय नसून तेलुगू, कन्नड, उर्दू अशा भारतीय भाषांसह रशियन, चीनी आदी बहुभाषा विषय घेत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी सोलापूर विद्यापीठ प्रयत्नशील असून, यासाठी भाषा संकुल उभारणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी पत्रकारांना दिली. 
 
कुलगुरू डॉ. मालदार म्हणाले, की शिक्षणातील माध्यम हे इंग्रजीबरोबरच मातृभाषाही असावी. उच्च शिक्षणातही मातृभाषा ही ज्ञानभाषा असावी. असा प्रयत्न या माध्यमातून होईल. विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत शिक्षणाची संधी पुढील करिअर करता यावे, यासाठी भाषा संकुल उभारणी महत्त्वाची ठरेल. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांसह भारतीय भाषा आणि पाश्चिमात्य भाषांचे अध्ययन या भाषा संकुलात होऊ शकेल. यासाठी अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सोलापूर बहुभाषिक शहर आहे. मराठीबरोबरच तेलुगू, कन्नड, हिंदी उर्दू या भाषांचा प्रभाव बोलीभाषेवर आहे. 

भाषा संकुलातही बहुभाषिक अध्ययनावर भर राहील. सध्या विद्यापीठात रशियन आणि चायनीज या दोन्ही भाषा बोलणे, लिहिणे वाचण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा अल्पमुदतीचा सर्टिफिकेट काेर्स चालवला जातो. मात्र पदव्युतर स्तरावरील पूर्णवेळ अभ्यासक्रमाचा आराखडा बनवण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. लवकरच शासन मान्यतेसाठी भाषा संकुलाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर याला मूर्त स्वरूप येऊ शकते. 
 
सोलापूर विद्यापीठाचा मानस अतिशय सार्थ 
डॉ.इरेश स्वामी, माजीकुलगुरू, सोलापूर विद्यापीठ : भाषांचा तौलनिक अभ्यास करणारे भाषा संकुल साेलापूर विद्यापीठात उभे करण्याचा कुलगुरू डॉ. मालदार यांचा मानस अतिशय सार्थ ठरेल. सोलापूर बहुभाषिक शहर आहे. येथे कन्नड, तेलुगू, मराठी, उर्दू, हिंदी आणि दक्षिणी उत्तर भाारतीय भाषांचा मिलाफ आहे. या संकुलाच्या माध्यमातून कोणत्याही दाेन भाषांमधील तौलनिक अभ्यास हा अतिशय उपयुक्त ठरेल. कालखंडनिहाय भाषांचा अभ्यास तसेच त्या त्या भाषांमधील विविध साहित्यकृती यांचा तौलनिक अभ्यास या भाषा संकुलाच्या माध्यमातून करता येऊ शकेल. 
 
डॉ. सुहास पुजारी, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद : सोलापूर विद्यापीठात भाषा संकुल होणे ही आंनदाची बाब आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी हे संकुल कार्य करेल. त्याच बरोबर पुढे जाऊन भाषा विषयातील संशोधन केंद्रही व्हावे. बोली भाषांचे अध्ययन संशोधन या संकुलाच्या माध्यमातून व्हावे. सोलापूर हे बहुभाषिक शहर असल्याने भाषा संकुल निर्मितीला चालना विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल. 
बातम्या आणखी आहेत...