आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना 30 जूनपर्यंत करा : उच्च न्यायालय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना येत्या ३० जूनपर्यंत करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी (दि. २) दिले. अण्णा डांगे समितीने केलेल्या पुजाऱ्यांच्या नियुक्त्या समिती अस्तित्वात येईपर्यंत कायम ठेवण्याची सूचनाही केली. नवीन समिती पुजाऱ्यांसंदर्भात निर्णय घेईल, असेही म्हटले आहे. 
 
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने पूजेसाठी अण्णा डांगे अध्यक्ष असताना तात्पुरते पुजारी नियुक्त केले. या नियुक्त्या करताना हंगामी स्वरूपातील समितीने मंदिर कायद्यामधील काही तरतुदींचे पालन केलेले नाही. त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे पुजारी नियुक्तीच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका २०१४ मध्ये सामाजिक कार्यकर्ते वाल्मीकी चांदणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती अभय ओक न्यायमूर्ती ए. के. मेनन यांच्यापुढे सुरू आहे. मंगळवारी न्यायमूर्ती ओक मेनन यांच्या खंडपीठाने ३० जूनपर्यंत राज्य सरकारने श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना करावी, असे निर्देश दिले. सध्याचे पुजारी नवीन समिती अस्तित्वात येईपर्यंत कार्यरत राहतील, असेही आदेशात म्हटले आहे. मंदिर समितीच्या वतीने अॅड. राम आपटे, याचिकाकर्ते वाल्मीकी चांदणे यांच्या वतीने अॅड. सारंग आराध्ये यांनी काम पाहिले. 
बातम्या आणखी आहेत...