आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकल्या विठ्ठलाची प्रक्षाळपूजा; गवती चहा, आयुर्वेदिक काढ्याचा नैवेद्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेस दुर्मिळ अलंकारांनी सजवले होते. - Divya Marathi
श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेस दुर्मिळ अलंकारांनी सजवले होते.
पंढरपूर - येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुरुवारी प्रक्षाळपूजेचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात झाला. मंदिर समितीच्या वतीने प्रक्षाळपूजेनिमित्त केशर पाण्याच्या स्नानानंतर श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेस खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.   दरवर्षी आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर परंपरेनुसार प्रक्षाळपूजेचा उत्सव श्री विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात होत असतो.  आषाढी यात्रेमध्ये भक्तांना चोवीस तास दर्शन देऊन थकलेल्या विठ्ठलाचा थकवा किंवा शिणवठा जावा म्हणून परंपरेनुसार श्री विठुरायाला रात्री गवती चहासह विविध प्रकारचे १५ ते १६ पदार्थांचा आयुर्वेदिक काढा रात्रीच्या वेळी दाखवण्यात आला.   
 
आषाढी यात्रेच्या काळात दररोज पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूपआरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंगही काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन श्री विठ्ठलाला देखील थकवा येतो.  तो दूर करण्यासाठी यात्रेनंतरचा शुभ दिवस पाहून मंदिरात प्रक्षाळपूजेची परंपरा आहे.   बुधवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची स्वच्छता झाली. गुरुवारी दुपारी १२ वाजता श्री विठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. देवाला लिंबू-साखर लावण्यात आले. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने खास पुरणपोळीचा नैवेद्य श्री विठ्ठलाला दाखविण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...