आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा म्हणतात, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राजकीय वर्तुळात पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या चर्चा, प्रत्यरोप विकासकामाच्या दृष्टीने जाहीरनामा सादर करण्यात येतात. त्यास महाविद्यालयाच्या कट्टा कसा अपवाद ठरणार. शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्या मध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होत आहेत. 
 
नगरसेवक हा मतदान हक्क बजावण्यात येणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांशी ‘दिव्य मराठी’च्या तीने संवाद साधण्यात आला. त्यावेळी दयानंद कला शास्त्र महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी दिलखुलास निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून अपेक्षा व्यक्त केल्या.
 
दयानंदच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया सोलापुरात आले, त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो या पथनाट्यातून नागरिकांचे प्रबोधन केले. 
 
आदिती मळेकरी - पालिका निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी सर्व प्रभाग स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. पायाभूत सुविधा द्याव्यात. शहरात अतिक्रमण झाल्याने ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न करावा. मतदार राजा जागो हो लोकशाहीचा धागा हो या पथनाट्यातून प्रबोधन करीत आहोत.” 
 
श्वेता झंवर - प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून,त्यासाठी सोडविण्यासाठी वारंवार प्रयत्न करावेत. शासन अथवा पालिकेच्या शासकीय योजना सामान्य जनता पर्यंत खेचून आणणारा असावा. नगरसेवक यांनी निवडणुकीपुरते संपर्कात राहणे, नंतर फोन बंद करणे या गोष्टी टाळाव्यात. प्रभागात वारंवार कार्यरत राहणारा असावा.” 
 
मयुरी रामपुरे- नागरिकांची सेवा करण्यासाठी महापालिकेत नगरसेवकांना निवडून दिले जाते. पण, याचा विसर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी होऊ नये. नागरिकांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे याची जाणीव असावी. स्वच्छ पाणीपुरवठा तोही पुरेसा प्रमाणात वेळेवर मिळावा. शहरातील खराब रस्ते दुरुस्त करावेत.”  
 
प्रियांका काकडे - निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी प्रभागालाच कुटुंब समजले पाहिजे. कुटुंबाचा प्रमुख या नात्याने सोई सुविधा दिल्या पाहिजेत. पाणी अस्वच्छ येते,त्यावेळी नैतिकता जपत नगरसेवकांनी नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठवड्यातून प्रभागाची पाहणी करावी.” 
 
कमलाकर रूगे - नगरसेवक शिकलेला असावा. निवडून आल्यावर नगरसेवकांनी शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभागातील तरुणांना एकत्र करून प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टीने विचार- विनिमय करावा. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक भागविण्यासाठी प्रत्येक वार्डात अभ्यासिका असायला हवी.” 
 
शुभम पतंगे - नगरसेवकांनी प्रभागातील बालक अथवा विद्यार्थ्यांना पायाभूत शैक्षणिक सुविधा मिळतात की नाही, याची पाहणी करुन शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात. प्रभागात समस्या असतील,त्या समस्यांवर तत्काळ उपाय शोधने, नागरिकांना सोई निर्माण कराव्यात. प्रभागासाठी निवडून येणारा नगरसेवक पारदर्शक असावा.” 
बातम्या आणखी आहेत...