आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाॅट्सअॅपवरून अफवा, २२ जणांवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी / मंगळवेढा - व्हॉट्स अॅपवरून अफवा पसरविणाऱ्या तीन ग्रुपच्या अॅडमिनसह सहा जणांविरोधात बार्शी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तन्मय प्रकाश मन्सलकर (रा. अध्यापक कॉलनी, बार्शी), वैभव बिभीषण औताडे (रा. कॅन्सर रुग्णालयाजवळ, बार्शी), रियाज हाजी सौदागर (रा. मंगळवार पेठ, बार्शी), बिलाल मुख्तार पिंजारी (रा.मंगळवार पेठ, बार्शी) अशी त्यांची नावे आहेत. अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा यात समावेश अाहे.
तसेच मंगळवेढ्यात दोन ग्रुप अॅडमिनवर कारवाई केली. जयसिंग कर्णेकर (रा. मंगळवेढा) परशुराम धनवे ( रा. नागणेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. तर पंढरपुरात आणखी सोळा जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मागील काही दिवसांपासून िजल्ह्यात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या अफवांमुळे सार्वजनिक शांततेला बाधा येत आहे. मागील आठवड्यात अशा प्रकारे मालवंडी परिसरातील घटनेत एका महिलेचा नाहक बळी गेला. अफवेमुळे लोकांमधील भीतीचे वातावरण आणखी गडद होत आहे. अशांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी शोध घेतला. त्यात संशयितांनी व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून तीन हजार जण तलवारी घेऊन आले. लहान मुलांना चोरणारी टोळी आल्याची अफवा पसरवल्याचे आढळून आले. त्यामुळे या सहा जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना सोडून देण्यात आले.