आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमधील वायफाय कनेक्टिव्हिटीसह डेटाचा पत्ता नाही, प्रवाशांनी हॉटस्‍पॉटच्‍या वाटेला जाणेच टाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसवण्यात आलेली वायफाय हॉटस्पॉट कनेक्टिव्हिटी नावालाच असल्यासारखी परिस्थिती आहे. हॉटस्पॉट सुरू केल्यानंतर वायफाय कनेक्ट होत आहे. मात्र, डेटाच अॅक्सेट होत नाही. यामुळे प्रवासी वैतागून बसमधील हॉटस्पॉटच्या वाटेला जाणेच टाळत आहेत.
 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यातील अनेक योजना यशस्वी झाल्या आहेत. तर काही योजना मात्र, नावालाच आहेत. विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक सवलत, चार सहा दिवसांच्या पास, प्रासंगिक करार या प्रचलीत सेवा पूर्वीपासून आहेत. आता वातानुकूलित बससेवाही सुरू करण्यात आली आहे. सध्या मोबाइलवर इंटरनेट वापराचे फॅड सुरू झाले आहे. विविध दुकाने, माॅल, रेल्वे येथे वायफायच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

यामुळे आता परिवहन मंडळानेही ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे १८००० बसमध्ये वायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील काही बसमध्ये सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही सुविधा केवळ नावालाच असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. मोबाइल हॉटस्पॉट सुरू केल्यानंतर वायफाय सुरू झाल्याचे दिसते. मात्र, डाटा अॅक्सेस होत नाही. कोणतेळी मोबाइल अॅप्लिकेशन सुरू होत नाही. युट्यूब, व्हाॅट्सअॅप, फेसबुकचे अप्लिकेशनही सुरू होत नाही. तसेच अन्य कोणत्याही ब्राऊझरहून डाटा अॅक्सेस होत नाही. केवळ वायफाय सुरू झाल्याचे मोबाइलवर दिसते. 
 
कंपनीकडे कंत्राट 
सुविधेचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. मात्र याची एकत्रित माहिती आगारात उपलब्ध नाही. 

महामंडळाने वायफाय सुविधेचा मोठा गाजावाजा केला. तसेच हॉटस्पॉट किट बसवलेल्या बसमध्ये स्टीकरही लावण्यात आले आहेत. यामध्ये प्रवाशांना या सुविधेचा फायदा घेण्याबाबत सुचवले आहे. यासंदर्भात विभागीय नियंत्रक राजीव साळवी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 
 
उस्मानाबाद-परभणी बसअन्य बसमध्ये बसून वायफाय सुरू केले होते. मात्र, याचा काही उपयोग होत नाही. महामंडळाने सोय करावी.
 - व्ही.डी. माळी, प्रवासी, उस्मानाबाद. 
बातम्या आणखी आहेत...