आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रावर प्रथमच महिला कर्मचारी, प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत महिला काम करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी दुपारी मतदानयंत्रे घेऊन निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले. - Divya Marathi
बुधवारी दुपारी मतदानयंत्रे घेऊन निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले.
उस्मानाबाद - जिल्हा निवडणूक विभागाने प्रथमच महिला कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करण्यासाठी नियुक्ती केली आहे. उस्मानाबाद उमरगा तालुक्यात ४५० महिला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी म्हणून काम करणार आहेत. असा प्रयोग प्रथमच होत असून त्यांचा बुधवारचा (दि. १५) मुक्काम मतदान केंद्रावरच असणार आहे. अन्य ठिकाणी नेहमीप्रमाणे बुरखाधारी महिला मतदारांना ओळखण्यासाठी महिलांची नियुक्ती केली आहे. 
 
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने जोरदार तयारी केली आहे. बुधवारी मतदान यंत्र अन्य साहित्य नेण्याची लगबग सर्वत्र दिसत होती. कर्मचाऱ्यांनी आपली यत्रे साेबत घेऊन तालुक्याचे ठिकाण सोडले. रचना करण्यासाठी लवकर पोहोचून केंद्रात व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्यामुळे सकाळपासूनच कर्मचाऱ्यांची गर्दी दिसत होती. यावेळी प्रथम निवडणूक विभागाने प्रत्यक्ष मतदान करवून घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उस्मानाबाद उमरगा तालुक्यात अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

उस्मानाबाद तालुक्यात २२८ मतदान केंद्रावर प्रत्येकी एक याप्रमाणे वर राखीव २२ अशा २५० उमरगा तालुक्यात १६५ केंद्रावर प्रत्येकी एक या प्रमाणे ३५ राखीव अशा २०० महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला आहे. पूर्वी केवळ बुरखाधारी महिला मतदारांना ओळखण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. अन्य तालुक्यात या कामासाठी महिला कर्मचारी आहेत. दोन तालुक्यात मात्र, प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये या महिला भाग घेणार आहेत. शिक्षिका विभागातील कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रकारचे दोन प्रशिक्षणही देण्यात आले आहेत. अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे या महिला बुधवारीच मुक्कामासाठी केंद्राकडे निवडणूक आयोगाने ठरवलेल्या बसने रवाना झाल्या आहेत. उस्मानाबाद येथे निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनात सर्व कर्मचारी साहित्यासह रवाना झाले आहेत. आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांना दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रात्रीच्या भोजनासाठी त्यांना फुड पॅकेटची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वच महिला कर्मचाऱ्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता. 

१६७ जन तात्पुरते हद्दपार : शांततेनेमतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १६७ जणांना हद्दपार करण्यात आले असून १२०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यांच्यावर पूर्वी निवडणुकीच्या दरम्यान गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
 
अखेर सुटी मिळाली 
मंगळवारपर्यंत सुटीबाबत अधिकृत आदेश मिळालेले नव्हते. केवळ दोन तासच अवधी मतदानासाठी देण्यात येणार असल्याचाच आदेश कर्मचाऱ्यांना माहिती होता. यामुळे काही कर्मचारी थेट केंद्रात जाऊन विचारणा करत होते. अखेर बुधवारी (दि. १५) जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच कार्यालयाना सार्वजनिक सुटी असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे.त्यामुळे मतदानात वाढ होऊ शकते. 

दोन हजार पोलिस 
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी दोन हजार पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये दहा पोलिस उपाधीक्षक, १०३ सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक हजार ३०० हवालदार, ५७५ गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ८० गावे संवेदनशील आहेत. यामुळे येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, १२७ बसची व्यवस्था... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...