आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - घरी एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश-१ यांनी दोषी मानून पाच वर्षे सक्तमजुरी हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा दि. ऑगस्ट रोजी सुनावली. 
 
१५ जुलै २०१६ पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. तिचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. ही संधी साधत आरोपी तावजी हरिश्चंद्र क्षीरसागर हा वाईट हेतूने तिच्या घरात शिरला तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घराबाहेर धाव घेऊन आरडाओरड करत शेजाऱ्यांना माहिती दिली. घडल्या प्रकारावरून तुळजापूर पोलिस ठाण्यात आरोपी तावजी क्षीरसागर विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.याप्रकरणाचा तपास करून पोलिस उपनिरीक्षक एम.पी.पवार यांनी दोषारोपपत्र सादर केले. प्रकरणाची जिल्हा सत्र न्यायाधीश क्र.१ एस.ए.ए.आर.औटी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी समोर आलेले साक्षी, पुरावे तसेच शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी क्षीरसागर याला पाच वर्षे सक्तमजूरी दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. 
बातम्या आणखी आहेत...