आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रियांनी व्यक्त व्हावे, भावना मारणे अयोग्य - लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘कादंबरी प्रमाणे जगता येत नाही आणि आपण जे जगतो, ते वाचण्यात येत नाही. कारण आपण अापल्या भावनांना कायम मारत असतो. स्त्रियांचेही असेच आहे. त्या कायम आपल्या मनाला मारतात. कधीतरी एकदाच त्यांचा उद्रेक होतो. त्यासाठी स्त्रियांनी बोलायला हवे, व्यक्त होणे गरजेचे आहे, असा सल्ला लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांनी दिला. 
 
डॉ. इंगोले म्हणाल्या, पूर्वी काळ वेगळा होता. सर्वसामान्यांना फुलांचा वापर कोणत्या कामासाठी होतो? असे विचारले तर दोनच पर्याय पुढे यायचे. एकतर देवाच्या मूर्तीवर चढवण्यासाठी दुसरा म्हणजे मृत्यू झाल्यावर हारामध्ये. पण साहित्य आणि चित्रपटामुळे फुलांचे प्रेयसीला देण्यात येणाऱ्या गजऱ्यात आणि मनोरंजनपर कार्यक्रमात हातात माळण्यासाठी असे अन्यही प्रकार असतात, हे समोर आले. 
 
आमच्या महाविद्यालयीन काळात आम्ही ना. सी. फडके अन्य लेखकांच्या कादंबऱ्या कथा वाचायचो. पण हे कळाले होते की, कादंबरी वेगळी आणि प्रत्यक्षातले जीवन वेगळे. या वेळी मंचावर डॉ. सुहास पुजारी, अॅड. जे. जे. कुलकर्णी, प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर, निर्मला मठपती आणि वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या. 
 
शब्दांचे अर्थ माझं एम. ए. 
माझ्या लिखाणात अनेकदा अवघड शब्द येतात, असे प्रकाशकांनी सांगितल्यावर त्या शब्दांचे अर्थ पुस्तकाच्या शेवटच्या पानावर छापण्यात आले. भुलाई हे पुस्तक लिहिताना काँटिनेंटल प्रकाशन तसेच देशमुख अँड कंपनी या कंपन्यांनी पुस्तकाच्या शेवटी माझ्या काही शब्दांचे अर्थ छापल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. एम. ए. शिकत असताना पण लक्षात कोण घेतो? या पुस्तकाने बरीच प्रेरणा मिळाल्याचे इंगोले यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...