आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोन समितीवर वर्चस्वासाठी भाजपचे प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेतील पदाधिकारी निवडीनंतर आता झोनच्या समिती आणि सभापती निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेचे आठ झोन असून, बहुतांश झोनवर भाजपचा सभापती यावा, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. 
 
झोन समिती सभापतिपदासाठी पक्षाचे नगरसेवक जास्त असणे आवश्यक आहे. शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील क्रमांक तीन झोनमध्ये दोन ठिकाणी भाजपला अडचण येणार आहे. तीन प्रभागांचा एक झोन केल्यास प्रभाग क्रमांक एक ते तीनमध्ये भाजपचे नगरसेवक असल्याने तेथे सभापती करण्यास अडचण नाही. 

प्रभाग चार ते सहामध्ये बसप, भाजप शिवसेना असे प्रत्येकी चार सदस्य असल्याने बसपची भूमिका महत्त्वाची असणार आहे. सात ते नऊमध्ये शिवसेनेची सरसी राहणार आहे. राजकीय गणिते जुळवून प्रयत्न केल्यास काही ठिकाणी भाजपचे तर काही ठिकाणी शिवसेनेचे सभापती होतील. किमान यासाठी भाजप शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास काँग्रेस आणि एमआयएमला झोन सभापतिपद मिळणे कठीण होईल. अर्थात महापालिकेचे स्थायी समिती, परिवहन समिती, विषय समिती निवडीनंतर झोन सभापती आणि स्वीकृत सदस्य नेमण्याचा विचार भाजपचा आहे. 

पारदर्शक कामाच्या मुद्द्यावर मनपात सत्तेवर आलेला भाजप काय भूमिका घेणार? हे येणाऱ्या काळात कळेल. भौगोलिक परिस्थितीनुसार निवडी केल्यास नागरिकांची सोय होईल. पण काही राजकीय समीकरणे जुळणार नाहीत. 

झोन समितीस पाच लाखांपर्यंत कामाचा अधिकार 
मनपाझोन समितीस पाच लाखांपर्यंत काम करण्याचा अधिकार आहे. पक्षाकडून काही पदे महापालिकेत नाही मिळाल्यास सभापतिपद मिळेल, अशी आशा नगरसेवकांना असते. पाइपलाइन दुरुस्ती, नळजोड देणे, रस्ते, दिवाबत्ती दुरुस्ती, पाणीपुरवठा आदी नागरी कामे झोन कार्यालयामार्फत केली जातात. 
 
बातम्या आणखी आहेत...