आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेवणकर ज्वेलर्स मधील चोरी उघडकीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शांतीचौकातून मोटारकार चोरली. त्याचा वापर करीत शिंदे चौकातील रेवणकर ज्वेलर्स दुकान फोडून ११ ताेळे चांदी पळवली. या प्रकरणातील दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हरजितसिंग शिशुपालसिंग टाक (वय २८, रा. तळेहिप्परगा, मलखानसिंग मायसिंग दुधाने (वय २७, रेल्वे स्टेशन मागे, विजयपूर, कर्नाटक) यांना अटक केली आहे. साडेआठ किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
चोरलेली मोटार कार जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने तीही ताब्यात घेण्यात आली असून एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, बाळासाहेब शिंदे त्यांच्या पथकाला रेवणकर ज्वेलर्समधील चोरीबाबत माहिती मिळाली होती. त्यातील दोघे संशयित जुना तुळजापूर नाका येथे थांबल्याची माहिती मिळाली. चौकशीत, चौघांनी मिळून हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...