आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकारीचा प्रकार : अरणमध्ये हरणाची हत्या, पाठलाग करून गोळीबार; गावठी बंदुकीचा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेंभुर्णी - अरण(ता. माढा) येथील टोणपे वस्तीलगत एका सात ते आठ महिन्यांच्या काळवीटाची शिकार करण्याचा उद्देशाने अज्ञात व्यक्तीने गावठी बंदुकीतून गोळ्या झाडूून हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन ते चार वाजण्याचा सुमारास घडली. बुधवारी (दि. १९) शवविच्छेदन केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होईल. 
 
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका गजग्या कलरच्या तवेरा गाडीतून अज्ञात चार ते पाच जण अरण भेंड गावच्या शिवेवर येथील टोणपे जवळच्या माळरानावर आले. परिसरातील शेतकरी कामात व्यग्र असताना पंधरा ते वीस काळवीटांच्या कळपाचा पाठलाग करीत गजग्या कलरची तवेरा गाडी वेगात आली. त्यामधून एक व्यक्ती उतरला अन् त्याने कळपावर बेछुट गोळीबार केला. यामध्ये सात ते आठ महिन्यांच्या एका काळवीटाचा मृत्यू झाला. त्याच्या तोंडावर मोठी जखम झाली अाहे. आवाजामुळे इतर काळवीट पळून गेले. त्या आवाजाने टोणपे वस्तीतील महिलांची नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. काळवीट पडताच लोक जमा होऊ लागल्याने गोळीबार करणारे वाहनातून पळून गेले. 
 
यापूर्वीही माढा तालुक्यात काहींनी काळवीटांच्या शिकारी केल्या होत्या. यावर कुणीही कारवाई केलेली नव्हती. यामुळे हरणांची संख्या कमालीची घटली असून, आजच्या भरदिवसा झालेल्या हत्येचा तपास लावून गुन्हेगारांना शिक्षा देतील का? हा प्रश्न आहे. शिकारीचा प्रकार थांबवण्याची मागणी होत आहे. 
 
काळवीट हा परिशिष्ट एक मधील वन्यजीव आहे. त्यावरील झालेल्या गोळीबाराची माहिती उपवनसंरक्षक, सहायक उपवनसंरक्षकांना नव्हती. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. व्ही. कुलकर्णी हे सांगोल्यात असल्याने घटनास्थळी गेलेच नव्हते. त्यांनाही त्याबाबतची फक्त प्राथमिक माहिती होती. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी गंभीर घटनांबाबत बेदखल असल्याचे दिसून आले. 
 
यापूर्वीही शिकार 
आठ वर्षांपूर्वी तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) शिवारात बंदुकीतून गोळ्या झाडून काळवीटांची शिकार झाली होती. मुंबईतील प्रतिष्ठित लोकांनी दोन काळवीटांची शिकार करून पार्टी केली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या शिकाऱ्यांना पकडले होते. सोलापूर न्यायालयात खटला दाखल झाला होता. 
 
> प्रत्यक्षदर्शींना भेटूनमाहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्या काळवीटाच्या तोंडावर जखम आहे. रात्री शवविच्छेदन करण्यात येत नसल्याने बुधवारी सकाळी पशुवैद्यकीय केंद्रात करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. लोकांच्या म्हणण्यानुसार छर्रेच्या बंदुकीचा वापर करून हत्या केल्याची शक्यता आहे. 
बाबासाहे बलटके, वनसंरक्षक 
बातम्या आणखी आहेत...