आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरातील पाऊस गेला सुटीवर, जुलै पंधरवड्यात फक्त 6 मिमी पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सोलापूर - गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील पावसाने दडी मारली आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यानंतर धो-धो बरसल्यानंतर पाऊस पुन्हा गायब झाला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यात फक्त ६.१५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. २० जूनपर्यंत जिल्ह्यात १५२ मिमी इतका पाऊस झाला होता. १६ जुलैपर्यंत यामध्ये मिमी इतकी वाढ होऊन १६१ मिमी इतकी झाली आहे. गेली महिनाभर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. 
 
मागील वर्षीपेक्षा १६ जुलैपर्यंत यंदा अधिक पाऊस झाला असला तरी गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस गायब झाला आहे. मागील वर्षी १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात १०२ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र १६१.९९ मिमी पाऊस झाला आहे. तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता सर्वच तालुक्यात १०० मिमी पाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडे नोंद झाली आहे. मात्र गेली महिनाभर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. 
 
तालुकानिहाय पाऊस 
उत्तर सोलापूर - ३.३६, दक्षिण सोलापूर -४.९३, बार्शी - १० मिमी, अक्कलकोट -३ , मोहोळ -२ , पंढरपूर -३, माढा -६ करमाळा -७ , सांगोला- १० माळशिरस -७ , मंगळवेढा १० मिमी. 
बातम्या आणखी आहेत...