आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग सर्व्हेवर आक्षेप, लाभार्थी ठरवण्यासाठी अाता समिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महापालिकेच्यावतीने िदव्यांग व्यक्तींना गरजेनुसार साहित्य िवतरण करण्यासाठी सर्वेक्षण करून ठरवण्यात अालेल्या लाभार्थी यादीवर महापालिका सर्वसाधारण सभेत अाक्षेप घेण्यात अाला. सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सर्वपक्षीय समिती गठीत करुन लाभ देण्याबाबत समितीला अधिकार देण्याचा ठराव पालिका सभेत घेण्यात आला.

जुलै महिन्यात तहकूब झालेली सर्वसाधारण सभा बुधवारी महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील दिव्यांगाना साहित्य वाटप करण्यासाठी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी त्यांच्या प्रभागापुरता प्रस्ताव दिला होता. प्रशासनाने सर्वेक्षण करून तयार केलेली यादी मंजुरीसाठी सभागृहासमोर सादर केली होती. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सर्वच भागातील दिव्यांगाचा समावेश करा, असा मुद्दा उपस्थित केला. नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थेची मदत घ्या, असे मत व्यक्त केले. दिव्यांगासाठी तीन कोटींची तरतूद अाहे, परंतु िवतरणच केल्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी विरोधीपक्षनेते नरेंद्र काळेसह अनिल पल्ली देवेंद्र भंडारे यांनी केली.

पल्स पोलिओवेळी दवाखान्यात सर्व्हे केल्याचे आरोग्य अधिकारी डाॅ. जयंती अाडके यांनी सांगितले. हद्दवाढ भागात दवाखाना नाही, सर्व्हे कसा केला ? असा प्रश्न अलका राठोड यांनी उपस्थित केला. चर्चेअंती सर्वपक्षीय समिती गठीत करुन निर्णय घ्यावा, अशी सूचना सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी केली, त्यास बहुमताने मान्यता देण्यात आली.

शहा कन्सल्टन्सी अहवालावर चर्चा नाही
आर्किटेक्चर कीर्तने यांना देण्यात आलेले बील आणि पाणीपुरवठ्यासाठी तयार केलेला शहा कन्सल्टन्सीचा अहवाल महापालिका सभागृहाने मागवला. प्रशासनाने अहवाल तयार करून सभागृहासमोर सादर केला परंतु त्यावर चर्चा झाली नाही.
बातम्या आणखी आहेत...