आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी यात्रेसाठी नागपूर, भुसावळ रेल्वे, प्रशासनातर्फे नियोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी मध्य रेल्वेच्या वतीने नागपूर भुसावळ रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे धावणार आहे. यामुळे भाविकांची सोय होण्यास मदत मिळणार आहे.
भुसावळ-पंढरपूर

गाडी(क्रमांक ०११४९) १४ जुलै रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावरून सकाळी वाजून २० मिनिटांनी निघेल. रात्री १० वाजून १० मिनिटांनी पंढरपूरला पोहचेल. गाडी (क्रमांक ०११५०) १५ जुलै रोजी पंढरपूरवरून रात्री १० वाजता सुटेल. भुसावळला दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी पोहचेल. गाडीला कुर्डुवाडी, जेऊर, भिगवण, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड आदी स्थानकांवर थांबा आहे.

नागपूर-पंढरपूर
गाडी(क्रमांक ०१२१२) १३ जुलै रोजी नागपूरवरून सकाळी वाजून २० मिनिटांनी सुटेल. पंढरपूरला पहाटे वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल. गाडी (क्रमांक ०१२११) १६ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून सकाळी वाजून मिनिटांनी सुटेल. नागपूर स्थानकावर मध्यरात्री वाजून ४० मिनिटांनी पोहचेल. गाडीला कुर्डुवाडी, दौंड , मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर आदी स्थानकांवर थांबा आहे.
बातम्या आणखी आहेत...