आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: काँग्रेसच्या गडाला सुरुंग, भाजपची जोरदार मुसंडी, काँग्रेसचा बालेकिल्ला हिसकावला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुरात विजयाचा जल्लोष करताना उमेदवार. - Divya Marathi
सोलापुरात विजयाचा जल्लोष करताना उमेदवार.
सोलापूर - काँग्रेसला नापसंती दाखवत सोलापूरकरांनी प्रथमच भाजपला भरभरून यश दिले अाहे. ४९ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे अाला अाहे. बहुमतासाठी त्यांना फक्त तीन जागा कमी पडत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला यंदा मागच्या निवडणूकीच्या तुलनेत २९ जागांचा फटका बसला. एमअायएमने ९ तर शिवसेनेने २१ नगरसेवक जिंकत काँग्रेसला थेट तिसऱ्या क्रमांकावर ढकलून दिले आहे. 
 
- काँग्रेसची सत्ता असलेल्या सोलापूर महानगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळवले आहे. याठिकाणी  भाजपला 47 जागा मिळाल्या आहे. याठिकाणी मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजपला केवळ 5 जागांची गरज असणार आहे.
 
शिवसेना याठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असून शिवसेनेने 20 ठिकाणी विजय मिळवला आहे. तर काँग्रेस तिसऱ्या स्थानावर घसरल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे केवळ 14 नगरसेवक निवडून आले आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि एमआयएम आणि अपक्षांसह इतर नगरसेवकांची संख्या 17 एवढी आहे.  त्यामुळे सोलापुरात भाजपला सत्ता स्थापण्यात यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सत्तेसाठी भाजप कोणती समिकरणे मांडणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेले असणार आहे, यात शंका नाही. 
 
 
UPDATES
 
- 5.00PM पर्यंतचे संख्याबळ भाजप 47 तर शिवसेनेचे 18 
- 5.00PM पर्यंतचे संख्याबळ काँग्रेस 11, राष्ट्रवादी काँग्रेस 3 
- 3.00PM पर्यंतचे संख्याबळ भाजप 39 तर शिवसेनेचे 20 
- 3.00PM पर्यंतचे संख्याबळ काँग्रेस 11, राष्ट्रवादी काँग्रेस 4 
- 2.00PM पर्यंतचे संख्याबळ भाजप 24 तर शिवसेनेचे 20 
- 2.00PM पर्यंतचे संख्याबळ काँग्रेस 6, राष्ट्रवादी काँग्रेस 4 
- काँग्रेसच्या अपयशानंतर प्रणिती शिंदेंना नाकारल्याची चर्चा
- 1.00PM : भाजपच्या विजयी आणि आघाडी असलेल्या एकूण उमेदवारांची संख्या 22 तर शिवसेनेचे 16
- 1.00PM : काँग्रेस 6 तर राष्ट्रवादी केवळ एका जागेवर पुढे
- एमआयएमची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट.
- 12.00PM : काँग्रेस घसरले तिसऱ्या क्रमांकावर
- 12.00PM : भाजपला 14 तर शिवसेनेला 12 जागांवर आघाडी
- भाजपचे विजयी उमेदवार -  अमर पुदाले, शोभा बनशेट्टी, सोनाली मुटकिरी, नागेश भोगडे
- प्रभाग क्र. ८ मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी  
- 11.30 : भाजप 10 जागांवर तर शिवसेना 5 जागांवर पुढे, काँग्रेसची पिछेहाट
- सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस भाजप आणि शिवसेनेचच्याही मागे..
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...