आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेड काढाल तर थेट आई‑वडील, पत्नीसमोर कानउघाडणी होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शाळा,काॅलेज, बाजारपेठा, रेल्वेस्थानक, बसस्थानक अथवा नोकरीच्या ठिकाणी महिला, तरुणी, यांची होणारी छेडछाड. धूमस्वार बाईकवर येऊन त्रास देणे असे प्रकार कुणी करीत असल्यास अाता पोलिस तक्रारीची वाट पाहता थेट संबंधित व्यक्तीला अाई, वडील अथवा पत्नीसमोर नेऊन कानउघाडणी करतील. त्यांना पहिल्यांदा समज दिली जाईल. दुसऱ्यांदा सापडल्यास थेट गुन्हा दाखल होईल. ही कारवाई सोमवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निर्भया पथक या नावाने सुरू होईल. सुमारे अडीचशेहून अधिक पोलिसांचे पथक नेमले अाहे.
शाळा, काॅलेजला जाताना मुलींची होणारी छेड. शेरेबाजी अथवा बाजारपेठेत गेल्यानंतर महिलांना काहीजण त्रास देतात. खासगी नोकरीच्या ठिकाणी कुणी छेड काढत असेल हे पथक कारवाई करेल. पोलिस ठाणे, चौकीनुसार पाचहून अधिक महिला पुरुष पोलिस नेमलेत. तालुकास्तरावरही महत्त्वाच्या ठिकाणी पथक थांबेल. असे प्रकार अाढळल्यास त्या व्यक्तीला थेट त्याच्या घरी नेण्यात येईल. जर तो विवाहित असेल तर पत्नीसमोर अथवा अविवाहित असेल तर अाई, वडिलांसमोर त्याचे कृत्य उघड करण्यात येईल. समन्स पत्र देण्यात येईल. दुसऱ्यांदा असा प्रकार करताना अाढळल्यास गुन्हा दाखल होईल.

शहरातही माता-पिता तक्रार निवारण केंद्र
ज्येष्ठ नागरिक अथवा घरगुती कारणावरून अाई, वडिलांना कुणी त्रास देत असेल तर पोलिस त्यांना मदत करणार अाहेत. म्हणजे पोलिस अायुक्तालयात माता-पिता तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात अाले अाहे. महिला समस्या निवारण केंद्राच्या शेजारी हे कक्ष अाहे. वयस्कर मंडळींना कुणाचा त्रास असेल तर ते थेट पोलिसांना कळवून मदत घेऊ शकतात. घरात मुलगा, सून किंवा अन्य नातेवाइकांकडून त्रास होत असेल तर ते या कक्षात तक्रार देऊ शकता. संबंधित पोलिस त्याचे निवारण करतील.

येथे संपर्क करा
ग्रामीण: ०२१७-२७३२०००, शहर : ०२१७-२७४४६००
टोल फ्री नंबर : १०९१, व्हाॅट्सअॅप अथवा पोलिस अॅपवरही तक्रार देऊ शकता.

पोलिस अायुक्तालयात याही सुविधा
- दर शनिवारी सर्व पोलिस ठाण्यात नागरिकांसाठी गाऱ्हाणी दिवस
- पोलिस मित्र अॅप, त्यावरून थेट माहिती देऊ शकता
- छेडछाड महिलांविषयक समस्या रोखण्यासाठी दामिनी पथक

तक्रार अाल्यास मदत
^अाई,वडील अथवा ज्येेष्ठ नागरिकांना त्रास देत असल्यास कुणीही तक्रार करावी. थेट संबंधितावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल. यासाठी कक्षाची स्थापनाही करण्यात अाली अाहे. ज्यांना प्रत्यक्षात येऊन तक्रार देता येत नाही त्यांनी फोनवरून माहिती दिल्यास अामचे पोलिस घरी येतील. पौर्णिमा चौगुले, पोलिस उपायुक्त

अाजपासून मोहीम
^निर्भया पथक अाजपासून सुरू होईल. या पथकातील अडीचशे पोलिसांची कार्यशाळा घेण्यात अाली. महिला फौजदार जाधव यांच्याकडे नियोजन अाहे. महिला मुलींनी तक्रारही द्यावी. अाम्ही स्वत:हून कारवाई करणार अाहेत. महिलांचीही साथ पाहिजे. या पथकाला दामिनी पथकही सपोर्ट करेल वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक
बातम्या आणखी आहेत...