आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूपाभवानी मंदिर विकासाचा आराखडाच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील सिद्धेश्वर मंदिरानंतर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले रूपाभवानी मंदिर हे सर्वात मोठे मंदिर अाहे. सव्वाशे वर्षापासून या ठिकाणी हजारो भाविक येतात. पण परिसराचा विकास झाला नाही. त्यामुळे परिसरात गैरप्रकार तर वाढले अाहेतच. ना मनपा प्रशासन लक्ष देते ना शासनाच्या कोणत्या योजना राबवल्या जातात. लोकप्रतिनिधी अाणि अधिकाऱ्यांनी लक्ष घातले तर शहरातील ते एक निसर्गरम्य चांगले धार्मिक पर्यटन स्थळ बनू शकते.

हीअाहे मंदिराची अाख्यायिका
सव्वाशेवर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी झाली. दीपक जंबुकुमार शहा यांच्या मालकीच्या शेतजमिनीत अंबादास पवार शेतीचे काम करत होते. त्यावेळी नांगरटीमध्ये मूर्ती सापडली. ही मूर्ती रूपाभवानी देवीची. तेव्हा तेथे चुना अाणि लाकडाचा वापर करून मंदिर उभारले गेले. त्यानंतर मंदिराचे १९६८ मध्ये दगडी बांधकाम सुरू करण्यात अाले. ते १९७५ ला पूर्ण करण्यात अाले. याबद्दलही मतभेद व्यक्त केले जातात.

मंदिर सुधारणेकडे अक्षम्य दुर्लक्ष
१९७५ मध्ये दहा गुंठे जमिनीवर मंदिराची उभारणी झाली होती. जवळपास अडीच एकर जागेचा एकूण परिसर अाहे. तेथे ४० वर्षात काहीच सुधारणा झाली नाही. त्यावेळची स्थिती अाणि अाजची स्थिती थोड्या फार फरकाने सुधारली. काही वर्षापूर्वी तेथे मनपाने एक कमान उभारली अाणि गेल्यावर्षी तुळजापूर रोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने वाॅलकंपौंड बांधण्यात अाले. इतकीच काय ती सुधारणा.

सुविधां अभावी गैरप्रकारांना वाव
मंदिराच्या अाजूबाजूला असलेल्या परिसरात रात्री अंधाराचेच साम्राज्य असते. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन तळीरामांची गर्दी तेथे नेहमीच होते. अनेकवेळा हाणामारीचे प्रकार तेथे घडले अाहेत. त्यामुळे सायंकाळनंतर मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली अाहे. केवळ शुक्रवार अाणि मंगळवारीच काय ती थोडीफार सकाळी अाणि सायंकाळी गर्दी असते.

मंदिराच्या परिसरात कोणत्याच सुविधा नीट नाहीत. त्यामुळे भाविकांची संख्या कमी झाली अाहे. केवळ हातपंप अाहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही. महापालिका शहरात नको त्या ठिकाणी, खासगी ठिकाणी बाकडे ठेवते. पण मंदिर परिसरात बसण्यासाठी मनपाने चांगले बाकडे ठेवलेले नाहीत. स्ट्रीट लाइट, हायमास्ट दिव्यांची खरी गरज येथे अाहे. त्याचीही सोय याठिकाणी झालेली नाही. स्मार्ट सिटीकडे झेपावणाऱ्या शहरात दुसरीकडे असलेली ही दुरवस्था पाहता खरेच सोलापूर स्मार्ट सिटी होईल का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.

महापालिकेने उभारलेले समाजमंदिर दुर्लक्षित राहिल्याने मोडकळीस आले आहे.
रूपाभवानी चौकामध्ये गेल्या महिन्याभरापासून पाइपलाइनसाठी खोदलेला खड्डा तसाच आहे.
सोलापूरचे श्रद्धास्थान असलेल्या रूपाभवानी मंदिर परिसराचे हे छायाचित्र.

परिसराचा आराखडा नाही
^रूपाभवानी मंदिर परिसरात रस्ते सुधारण्यासाठीचा आराखडा महापालिकेकडे नाही. मंदिर विकास आराखडा तयार करण्यासंबंधीचे आदेशही आलेले नाहीत. मंदिरासमोरील एमएसआरडीसीने तयार केलेला रस्ता महापालिकेकडून दुरुस्त करण्यात आला आहे. याशिवाय त्या परिसरातील नाला परिसरातील सुधारणा करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. सारिकाआकुलवार, उपअभियंता,महानगरपालिका

जिल्हाधिकाऱ्यांंनी लक्ष घालावे
^रूपाभवानी मंदिर परिसरातील विकास कामांसाठी अाजपर्यंत फारसे प्रयत्न झाले नाहीत. न्यायालयीन वाद असल्याने कोणी पुढाकारही घेतला नाही. मंदिर व्यवस्थापनाला अार्थिक खर्चाच्या मर्यादा अाहेत. त्यामुळे सरकारने विशेषत जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर विकासाच्या कामांसाठी लक्ष घालावे. या ठिकाणी अापत्कालीन यंत्रणेच्या अनुषंगानेही अाढावा घ्यावा. मंदिर परिसराची जागा हजार चौरस फुटाचीच अाहे. त्यामुळेही मर्यादा अाहेत. मात्र विकास कामे झाली पाहिजेत असा अामचा प्रयत्न राहणार अाहे. तम्मामसरे (ट्रस्टी, रूपाभवानीमंदिर समिती)

शासनाकडे प्रयत्न करणार
^रूपाभवानी मंदिर सुधारण्यासाठी अार्थिकदृष्ट्या मंदिर व्यवस्थापनाला फारसा वाव नाही. तेवढे उत्पन्नही नाही. जागेचाही प्रश्न अाहे. अाहे त्या जागेतच काही करावे लागेल. मनपाने एक बाग तयार केली अाहे, पण ती अजून खुली झाली नाही. अाता सरकारकडे यासाठी अाराखडा तयार करून विकास कामे व्हावीत यासाठी निश्चित पाठपुरावा करणार अाहोत. या विषयी बैठका घेऊन निर्णय करता येतील. शाहूिशंदे (ट्रस्टी, भक्तमंडळ माजी शहरप्रमुख शिवसेना)

सुधारणेसाठी अामची ना नाही
^मंदिरपरिसरात महापालिका किंवा शासनाने जर विकास करण्याचा अाराखडा केला अाणि त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरवले तर अामची कोणतीच हरकत असणार नाही. पावसाळ्यात घाण पाणी मंदिराच्या अाजूबाजूलाच साचते. पाण्याचा निचरा करण्याची सोय व्हावी. नवरात्र सोडली तर या परिसरात फारशी वर्दळ नसते. त्यातच गैरप्रकाराने वागणारे काही लोक या ठिकाणी उपद्रव करतात. ते रोखण्यासाठी पोलिस सुरक्षेची गरज अाहे. परिसराची सुधारणा व्हायला हवी. बंडूअंबादास पवार (मंदिराचे पुजारी)

समाज मंदिर उभारले, गैरवापरच जास्त
मंदिराच्या परिसरात मनपाने एक समाजमंदिर उभारले. पण त्याची देखभाल झाली नाही. सध्या तर ते मोडकळीला अाले अाहे. एकही खिडकी शिल्लक राहिलेली नाही. दिवे नाहीत. अातातर तेथे कोणतेच कार्यक्रमही होत नाहीत. ही स्थिती पाहून ते बंद करण्याचीच मागणी मंदिर व्यवस्थापनाने केली होती. तेथे पोलिस ठाणे उभारण्याचेही प्रयत्न झाले. पण पोलिस ठाणे होऊ शकणार नाही, असे कळविण्यात अाले अाहे. इमारतीत चांगल्या सुविधा देऊन परिसर सुधारता येणे शक्य आहे.

मंदिर भक्त तरुण मंडळानेच पुढाकार घेण्याची आहे गरज
रूपाभवानी मंदिर आणि परिसराचा विकास झाला पाहिजे. यासाठी मुळातच विकास अाराखडा तयार झालेला नाही. त्यासाठी कोणी पुढाकारही घेत नाही, असे सध्याचे चित्र अाहे. रूपा भवानी मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मसरे, पवार, पतंगे कुटुंबीयांनाही त्यासाठी मर्यादा अाहेत. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून मंदिर परिसर सुधारण्याचा अाराखडा करण्याची गरज अाहे. दरवर्षी नवरात्राच्या काळात तेथील यात्रेचे व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी रूपाभवानी मंदिर भक्त तरुण मंडळाची अाहे. या मंडळाकडूनही फारसे काही प्रयत्न झालेले नाहीत. या मंडळाने जर पाठपुरावा करून अाराखडा केला तर तो शासन दरबारी अाणि महापालिकेकडून मार्गी लागेल, असे भाविकांना वाटते. त्यासाठी या मंडळाने पुढाकार घेण्याची गरज अाहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर सुवर्ण करण्याची तयारी सुरू अाहे. अक्कलकोटसह अनेक मंदिरांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला, महाराष्ट्रात नावलौकिक झाला पण रूपाभवानी मंदिर तेवढ्याच महत्त्वाचे असूनही कोणत्याच सुविधा नसल्याने अोस पडल्यासारखे झाले अाहे.

पाण्याचा निचरा होत नसल्याने अडचणी
मंदिरपरिसरात पावसाचे पाणी साचते. जवळच असलेल्या नाल्यातून घाण पाणी वाहते. पावसाळ्यात तर हे पाणी मंदिराच्या परिसरात साचते, त्यामुळे दुर्गंधी पसरते. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाही उभारलेली नाही. जवळच्या नाल्याचे कामही पूर्ण केले जात नाही. हे महापालिकेने करणे अपेक्षित अाहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठरवलेले कामही झालेले नाही
मंदिराकडेजाणारा कोणताच रस्ता चांगला नाही. रूपाभवानी चौक एमएसअारडीसी रस्त्यांमुळे सुधारलेला वाटला. पण काही वर्षातच त्याचीही दुरवस्था झाली. महापालिका प्रशासनाला देखभालही करता येत नाही. दुभाजक फुटलेले अाहेत. अायलँडची तोडफोड झालेली अाहे. रस्त्यावर चौकातच पाइपलाइनसाठी खड्डा खोदला गेला. महिन्यापासून तो तसाच अाहे. मंदिराजवळूनच महामार्ग जातो. त्यावर उड्डाणपूल उभारण्यात अाला अाहे. मंदिराकडून पुलाच्या खालून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली अाहे. तेथे मोठे वाहन नेणे कठीण अाहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याचे काम करताना हा परिसर सुधारण्याचे ठरले होते, तेही काम झालेले नाही.

वादाचाही झाला आहे परिणाम
रूपाभवानी मंदिर व्यवस्थापन पाहण्यावरून मसरे अाणि पवार कुटुंबीयांमध्ये न्यायालयीन वाद अाहे. त्यामुळेही मंदिरातील अंतर्गत सुधारण्याची काही कामे अडली अाहेत. त्यातूनही चर्चा अाणि मार्ग काढून सध्या मंदिरातील गाभाऱ्याच्या उंच असलेल्या पायऱ्या काढण्याचे काम सुरू अाहे. मात्र मंदिराच्या अाजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी खूप वाव अाहे.