आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममधून पैसे नाही, बँकेला १५ हजाराचा दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एटीएम केंद्रातून पैसेच आले नाहीत, पण खात्यातून वजावट झाली. त्याबाबत तक्रार केली असता, सहा महिन्यांनी १५ हजार रुपयांच्या दंडासह रक्कम देण्यात आली. बँक ऑफ इंडियाच्या सात रस्ता एटीएममध्ये हा प्रकार झाला. ही रक्कम मिळवण्यासाठी अभिजित अनिलकुमार बेळुंके यांना सहा महिने पाठपुुरावा करावा लागला. शेवटी केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजमधून पैसेच आले नाहीत, ही बाब उघड झाली. त्यानंतर बँकेने दंडासह रक्कम खात्यावर जमा केली.

बेळुंके बँक ऑफ इंडियाच्या विजापूर रस्ता शाखेतील खातेदार आहेत. १८ डिसेंबर २०१५ रोजी ते या बँकेच्या सात रस्त्यावरील एटीएम केंद्रात १० हजार रुपये काढण्यासाठी गेले. तिथे तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर पैसे आलेच नाहीत, पण खात्यातून १० हजार रुपयांची वजावट झाली. त्यांनी हा प्रकार बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना सांगितला. पण त्यांचे म्हणणे ग्राह्य मानले नाही. पासबुकवर एंट्री घेतली असता, १० हजार रुपये काढण्यात आल्याची नोंद झाली.
बातम्या आणखी आहेत...