आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांनंतरही वाळू राॅयल्टीची वसूली नाहीच, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आहेरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पाच्या बांधकामासाठी १६ ठेकेदारांनी सुमारे अडीच लाख ब्रास वाळू आणि मुरूम वापरलेला अाहे. मात्र जिल्हा प्रशासनाला वाळू मुरुमाची राॅयल्टीच भरलेली नसल्याचे समोर अाले. दक्षिण सोलापूर तहसीलदारांनी १६ ठेकेदारांना मिळून ५५७ कोटी ६१ लाख रुपये (रॉयल्टीच्या पाचपट) राॅयल्टीसह दंडाची आकरणी दोन वर्षांपूर्वी केली होती. तहसीलदार, प्रांताधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या सुनावणीत दंड कायम राहिला. पण वसुलीपोटीची कारवाई झालेली नाही. 
 
ठेकेदाराने एनटीपीसीला वाळू मुरुम खरेदीची दाखवलेली बहुतांश बिले बनावट असल्याचे समोर अाले अाहे. यामुळे महसूल वसुलीसाठी विविध निर्णय घेणाऱ्या शासनाचे रखवालदार ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न यातून होत आहे. 
 
काय आहे प्रकरण... 
दक्षिण सोलापूरचे तत्कालीन तहसीलदार रघुनाथ पोटे यांनी सन २०१५ मध्ये एनटीपीसी प्रकल्प उभारणीसाठी किती वाळू वापरली, किती मुरूम वापरला तो कोणाकडून घेतला, त्याची रॉयल्टी भरली का? याची माहिती एनटीपीसी प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मागवली होती. एनटीपीसीकडे संबंधित ठेकेदाराने राॅयल्टीच्या दाखवलेल्या पावत्या बनावट असल्याचे समोर अाले. कंपन्यांनी रॉयल्टी भरल्याने त्यांना पाचपट दंडाची आकारणी केली. यावर तत्कालीन प्रांताधिकारी पाटोळे यांनी तहसीलदार यांचा आदेश कायम केला. त्यानंतर हे प्रकरण अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे आले. गेल्या दोन वर्षांपासून यावर सुनावणी सुरू आहे. परंतु कोणावरही अद्याप फौजदारी कारवाई झालेली नाही. 
 
कोऱ्या आणि पावत्यांच्या दिल्या झेरॉक्स 
ठेकेदारांनी रॉयल्टी भरल्याचा पुरावा म्हणून कोऱ्या पावत्या दिल्या. त्यावर ठेकेदार, ठिकाण, ब्रास, रक्कम याचा कोणताच उल्लेख नसलेल्या पावत्यांचा समावेश आहे. काही ठेकेदारांनी तर पावत्यांचे झेरॉक्सही जोडले आहेत. गौण खनिज कार्यालयाने केलेल्या तपासणीमध्ये एकूण पावत्यांपैकी ७० टक्केहून अधिक पावत्या बोगस निघाल्या आहेत. यामुळे ठेकेदारांनी वाळू मुरूम कोठून उपसा केला, इतका मोठा उपसा करेपर्यंत महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष कसे झाले? हे प्रश्न उपस्थित होतात. यामुळे या ठेकेदारांकडून दंड वसूल करण्यास प्रशासन विलंब का लावत आहे? याबद्दलचे प्रश्न अनुत्तरित आहेत. 
बातम्या आणखी आहेत...