आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन ७/१२ तीन दिवसांपासून 'आॅफ'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सर्व्हरमधील बिघाडामुळे सोमवारपासून जिल्ह्यात ऑनलाइन सात-बारा उतारा देणे बंद आहे. सात-बारा उतारा मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. मार्च अखेर असल्याने शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे आणि नवीन खरेदी-विक्री प्रकरणासाठी सात-बारा उतारा घेण्यासाठी गर्दी होते. मागील तीन दिवसांपासून सर्व्हर बंद आहे, दुरुस्तीचे काम सुरू असल्याने उतारे मिळत नाहीत. अनेक लोक रिकाम्या हाताने परत जात आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत सर्व्हर सुरू होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...