आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवाना शिबिर नव्हे, बाजार! एजंटाकडे फार्म असताना मिळत नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नागरिक वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून अक्कलकोट येथील थडकी मळा येथे रांग लावून बसलेले. सकाळी नऊ पासून उन्हाचे चटके बसलेले. सकाळी अकरा वाजता आरटीओ अधिकारी येणे अपेक्षित असताना दुपारी १२.१० वाजता अधिकारी जयश्री झिणे यांचे पथक आले.
रांगेत उभे राहण्यासाठी धक्काबुक्की सुरू झाली. एकंदरीत परिस्थिती पाहता तेथे शिबिर नव्हे तर जणू बाजार भरल्याचे दिसत होते. हा प्रकार नेहमीचाच असल्याचे नागरिकांनी सांगितले.

ग्रामीण भागातील नागरिकांची सोय व्हावी म्हणून तालुका स्तरावर लायसन्स शिबिर घेण्यात येतात. महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी अक्कलकोट येथे शिबिर होते. ‘दिव्य मराठी’च्या चमूने तेथील परिस्थितीची पाहणी प्रत्यक्षात केली. अधिकारी झिणे हे सकाळी १०.३० वाजता वळसंग सूत मिलजवळ एक ट्रकची चौकशी करत होत्या. त्या १२.१० वाजता आल्या. सकाळी सातपासून लोक रांगा लावून बसले होते. पैसे भरण्यासाठी गर्दी होती. नागरिकांना अर्ज उपलब्ध नव्हते.
हंजगी, कणबस, नागणसूर, शावळ, मैंदर्गी आदी भागातील युवक आले होते. पण त्यांना एजंटाचा आश्रय घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. यावर काहीच उपाय नाही. दुचाकी आणि ट्रॅक्टर परवाना काढण्यासाठी एका युवकाकडून ८०० रुपये घेतले गेले. तसे अधिकाऱ्यासमोर एका युवकाने सांगितले. क्रमश:

अधिकारी झिणे यांना काही प्रश्न
प्रश्न - शिबिराचीवेळ ११ ची असताना १२.१० वाजता आपण आलात.
उत्तर- मलाएकच काम नाही, येताना कारवाई करत आले.
प्रश्न- नागरिकसकाळी सात वाजल्यापासून थांबलेत.
उत्तर- मीकाय करणार.
प्रश्न- नागरिकांनायेथे फॉर्म उपलब्ध नाहीत.
उत्तर- आपणफॉर्म देतच नाही. त्यांनी सोलापुरातून आणावेत.
प्रश्न- एकाफॉर्मसाठी १०० रुपये गाडी खर्च कसा परवडेल.
उत्तर- पुढच्यावेळीयेताना फॉर्म आणू.

चार ते पाच वेळा
चारवेळा आल्यावर आमचा नंबर येतो. फॉर्म मिळत नाही, एजंटाकडे फार्म असताना ते मिळत नाहीत. मी एजंटाकडून आलो. दुचाकी आणि चारचाकी लायसन काढण्यासाठी अडीच हजार रुपये दिलो.'' गुंडूरावपाटील, कणबस

आरटीओचे स्कॅनिंग
अक्कलकोटयेथील थडकी मळा येथे शिबिरातील अनुभव, ‘दिव्य मराठी’च्या चमूने केली पाहणी