आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीनंतर झालेली खरेदी विक्रीकर विभागाच्या रडारवर, २१ डिसेंबरला होईल उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोव्हेंबरलारात्री वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. लागलीच ४८ तासात मोठ्या संख्येने खरेदी झाली. प्रामुख्याने सोन्यात हा पैसा गुंतवला गेल्याची शंका आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी राज्याच्या विक्रीकर विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभी केली. सध्या या विभागात प्रलंबित थकबाकी वसुलीची मोहीम सुरू आहे. त्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत रद्द झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेण्यात येणार आहेत.

नोटाबंदीनंतर झालेली मोठी खरेदी म्हणजे काळा पैसा जिरवण्याचा प्रकार आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. या कालावधीत विक्रीच्या पावत्या बारकाईने पाहण्यात येणार आहेत. त्याचा सर्व तपशील २१ डिसेंबरला कळणार असल्याचे विक्रीकर सहआयुक्त उमाकांत बिराजदार यांनी सांगितले. प्रलंबित थकबाकी भरण्यासाठी राज्याने अभय योजना जाहीर केली. त्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. केंद्राने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्याने २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा रोखीने भरण्याची अधिसूचना काढली.

इथे भरा विक्रीकर ना पॅन, ना आधार
युनियन बँक ऑफ इंडियाच्या पुणे नाका, गांधीनगर, कुंभार वेस आणि होटगी रस्त्यावरील विक्रीकर कार्यालयातील बँकेच्या काऊंटरवर प्रलंबित विक्रीकर भरता येणार आहे. त्यासाठी रद्द झालेल्या ५०० आणि १००० च्या नोटा घेण्यात येतील. त्यासाठी पॅनकार्ड आदीची आवश्यकता नाही. मुदतीनंतर धडक मोहीम हाती घेण्यात येईल. संपर्क : ९९२३८ १५७७१, ८८०५१००९००.
बातम्या आणखी आहेत...