आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रांक शुल्क चुकवल्याने बाजार समितीला नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना भाड्याने गाळे देताना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारपत्रक करण्यात आले. नियमानुसार हे करारपत्र सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे रितसर मुद्रांक शुल्क भरून करणे अपेक्षित आहे. मुद्रांक शुल्क चुकवल्याने पहिल्या टप्प्यात ८८ व्यापाऱ्यांनी ३८ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क त्यावर टक्के प्रमाणे ६६ लाख ८८ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बाजार समितीला बजावण्यात आली आहे. ७०० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी मुद्रांक शुल्क भरले नाही.

यांच्याकडून होणार मुद्रांक शुल्कची वसुली...
गौतम ट्रेडर्स, महेश ट्रेडर्स, विभुते, गुंडप्पा रघोजी, बसप्पा शेट्टी, कोहिनूर ट्रेडिंग कंपनी, तुकाराम काळे, सोमशंकर यादवाड, सालार ट्रेडर्स, जयंतीलाल शहा, संतोष ट्रेडर्स, शिवकुमार राचेट्टी, अशोककुमार संकलेचा, साई कॉर्पोरेशन, भरतेश दोशी, नागेश ट्रेडर्स, एस. एम. दुलंगे, विश्वनाथ दुलंगे, जिल्हा मध्यवर्ती बँक, रमेशचंद शाह, उत्तरेश्वर पाटील, सुधीर रघोजी, विश्वनाथ नष्टे, लालचंद ओसवाल, विजयकुमार बगले, गणेश ट्रेडर्स यांच्यासह ८८ जणांकडे मुद्रांक शुल्क थकीत आहे.
बातम्या आणखी आहेत...