आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी 20 कारखानदारांना नोटीसा, आयुक्त डॉ. तिरपुडेंची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)साठी नोंदणी करून घेण्याच्या नोटिसा २० यंत्रमाग कारखानदारांना बजावण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी दिली. प्रत्येक कारखान्याची तपासणी करूनच या नोटिसा बजावत असल्याचेही ते म्हणाले. एकाच छताखाली २० पेक्षा अधिक कामगार ज्या कारखान्यात आहेत, तिथे हा कायदा लागू होतो. त्याची नोंदणी आवश्यक असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.
 
ऑगस्ट महिन्यात हा प्रश्न पेटलेला होता. मावळते श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. दरम्यान, बंडारू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्याच्या घडामोडी थंडावल्या. परंतु माझे काम सुरूच असल्याचे डॉ. तिरपुडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. जिथे कारखानदार युनिट पद्धत सांगतात, त्या कारखान्याची तपासणी सुरू अाहे. त्यासाठी स्वतंत्र निरीक्षकांचे पथक असून, संबंधित कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया आणि उपलब्ध मनुष्यबळ याची पडताळणी करूनच पुढची प्रक्रिया होते. कुठल्याही कारखानदारांना विशिष्ट मुदत दिलेली नाही. परंतु त्यांनी स्वत:हून नोंदणीसाठी पुढे येणे अपेक्षित आहे. तसे अद्याप घडलेले नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाई लवकरच होईल, असेही त्यांनी नमूद केले.
 
युनिट्स तपासणीसाठी स्वतंत्र पथके नियुक्त : कामगारांचीसंख्या विभागण्यासाठी कारखानदारांनी युनिट पद्धत अवलंबली. विविध उत्पादन प्रक्रियेतील कामगार वेगवेगळ्या विभागात काम करतात. त्यांची एकूण संख्या गणली (क्लबिंग) जाऊ नये, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. परंतु त्याचा तपास करताना, एकाच छताखालील कामगारांची संख्या गणली जाते. तिथे २० पेक्षा अधिक कामगार आढळून आले, की हा कायदा लागू होतो, असे सांगून नोटिसा दिल्या जातात. या कामासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत 

आदेश नाहीत 
श्रममंत्रालयाकडून कुठला आदेश आलेला नाही. कुठलेच निर्देश नाहीत. याचाच अर्थ माझी कारवाई पुढे जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार कारवाई सुरू केली. 
- डॉ. हेमंत तिरपुडे, विभागीय आयुक्त 
 
 
बातम्या आणखी आहेत...