आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम मैदानाच्या भाड्यासाठी "सिध्देश्वर' ला दुसरी नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सिद्धेश्वर यात्रा समितीने सिद्धेश्वर यात्रेसाठी दीड महिना होम मैदान वापरले, शासन निर्णयानुसार होम मैदानाचे ३० लाख रुपये भाडे होते. ते भरण्यासंबंधी मंदिर समितीला नोटीस बजावली होती. मंदिर समितीने भाडे भरल्याने उत्तरचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी दुसरी नोटीस बजावली आहे. या नोटिसीला उत्तर दिल्यास आता थेट मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

सिद्धेश्वर यात्रेत आपत्कालीन रस्ता आणि मॅटिंगवरून जिल्हाधिाकरी मंदिर समिती यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. उच्च न्यायालयाचा निर्णय आणि मुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीनंतर यात्रा पार पडली.यात्रेनंतर जिल्हाधिकारी मुंढे यांनी शासन निर्णयानुसार भाडे वसुलीची नोटीस बजावली. नोटीसमध्ये सिद्धेश्वर यात्रा समितीने सिद्धेश्वर यात्रेसाठी होम मैदानाचा उर्वरितपान

वाणिज्यिककारणासाठी वापर केला. १० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी शासकीय जागेचा वापर होत असल्यास त्यास भाडे आकारावे, असा शासन निर्णय आहे, त्यानुसार तहसीलदार कोळेकर यांनी पहिली नोटीस बजावली, मात्र त्याला मंदिर समितीने कोणतेच उत्तर दिले नाही. यामुळे पुन्हा बुधवार दि. १७ रोजी दुसरी नोटीस बजावली आहे.

होम मैदानाचेभाडे भरण्यासंबंधी दुसरी नोटीस बजावली आहे, आठ दिवसांमध्ये भाडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी मुदतीत भाडे भरल्यास तिसरी नोटीस देऊन मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. हणमंत कोळेकर, तहसीलदार.

पैसे भरण्याचा विषयच नाही...
भाड्यापोटी पैसेभरण्याची दुसरी नोटीस मिळाली आहे. आम्हाला शासनाने यात्रा भरविण्यासाठी अधिकृतपणे होम मैदान दिले आहे. यामुळे त्याचे भाडे भरण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही कायदेशीर उत्तरे आणि कागदपत्रेही त्यांना दिली आहेत. धर्मराज काडादी, अध्यक्षसिद्धेश्वर देवस्थान समिती.