आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओची सोलापूर विद्यापीठाला नोटीस, गाडीवर दिवा लावण्याची नाही परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या छायाचित्रात दोन गाड्या आहेत. पुढची गाडी कोल्हापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची असून त्यावर दिवा नाही; मागील गाडी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची असून त्यावर मात्र दिवा आहे. ऑगस्ट रोजी काढलेले छायाचित्र. - Divya Marathi
या छायाचित्रात दोन गाड्या आहेत. पुढची गाडी कोल्हापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची असून त्यावर दिवा नाही; मागील गाडी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची असून त्यावर मात्र दिवा आहे. ऑगस्ट रोजी काढलेले छायाचित्र.
सोलापूर- सोलापूरविद्यापीठाचे कुलगुरू एन. एन. मालदार यांच्या गाडीवर लावलेला पिवळा दिवा तत्काळ हटवा अन्यथा वाहनावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी विद्यापीठाला बजावली आहे.

मोटर वाहन कायदा (१९८८) च्या नव्या नियमाप्रमाणे कुलगुरूंच्या वाहनांवर पिवळा दिवा लावण्याची परवानगी नाही. तरीही सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन. एन. मालदार यांच्या एमएच १३ एझेड ९५३१ या गाडीवर पिवळा दिवा लावण्यात आला आहे. तो तत्काळ काढण्यात यावा. त्याची माहिती आरटीओ कार्यालयाला कळवावी, अन्यथा कारवाई होईल, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाने नोटिशीत म्हटले आहे.

मला याबाबत अधिक काही माहीत नाही. याची माहिती कुलसचिवांना असणार आहे. डॉ.एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ
आरटीओचे पत्र मिळाले आहे. आम्ही याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करीत आहोत. शिवशरणमाळी, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ.
कुलगुरूंच्यावाहनावर पिवळा दिवा बसवण्याची परवानगी नाही. नोटीस दिली आहे. बजरंगखरमाटे, आरटीओ