आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Notice To Yashodhara And Vadiya Hospital In Solapur

तीन दिवसांत जागा सरकारजमा करा; यशोधरा, वाडियाला नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शर्तभंगप्रकरणी शहरातील मल्लिकार्जुन हेल्थ केअर रिसर्च सेंटर संचलित यशोधरा हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटलने तीन दिवसांत जागेवरील बांधकामासह संपूर्ण जागा स्वत:हून सरकार जमा करावी. अन्यथा त्यानंतर आहे त्या स्थितीत ती जागा ताब्यात घेऊन सरकार जमा करण्यात येणार असल्याची नोटीस तहसीलदार समाधान शेंडगे नगरभूमापन अधिकारी डी. डी. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी शर्तभंग प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटलचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानुसार जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. यशोधरा हॉस्पिटलला हजार १३७ चौ.मी. तर वाडिया हॉस्पिटलला एकर जागा शासनाने हॉस्पिटलसाठी दिली होती. याबाबत त्यांना म्हणणे मांडण्याची मुदतही दिली हाेती. संबंधित संस्थांनी दिलेले म्हणणे असमाधानकारक वाटल्याने ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरात राबवण्यात आलेल्या शर्तभंग माेहिमेत जागा ताब्यात घेण्याच्या हा आदेश वगळता इतर प्रकरणांना न्यायालय महसूलमंत्री यांनी स्थगिती दिली आहे.
यशोधरा हाॅस्पिटलला ११ कोटी ३० लाख

रुपये भरण्याचे दिले आदेश
यशाेधरा हाॅस्पिटलला जागा जमा करण्याबरोबरच ११ कोटी ३० लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत विमा कंपनीकडून घेतलेले कोटी ३९ लाख ३५ हजार त्यावरील दोन वर्षांचे व्याज कोटी ९१ लाख रुपये असे एकूण ११ कोटी ३० लाख रुपये व्यवस्थापनाने आठ दिवसाच्या आत तहसीलदार कार्यालयाकडे जमा करावेत. अन्यथा ही रक्कम सक्तीने वसूल करण्यात येणार असल्याचे तहसीलदार यांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.