आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता शहरात ४० महिला चालवणार रिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित वाहतूक सेवा देण्यासाठी ‘महिला रिक्षाचालक’ ही संकल्पना आता उदयास येत आहे. मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि सप्तश्रृंगी महिला मंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद देत प्रशिक्षण घेतलेल्या ४० महिलांना शिकाऊ परवाना दिला. शासनाने महिला रिक्षाचालकांसाठी टक्के राखीव परवाने देण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच शहरातील भगिनींना लाभ दिल्याचे परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे म्हणाले. 
 
पूर्वभागातील विडी उद्योगातल्या महिला कामगारांना पर्यायी रोजगार, महिलांना अार्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उपक्रम अशा उद्देशातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्याला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. कुचन प्रशालेच्या प्रांगणात रिक्षा चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या उत्साहाने आल्या. परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून त्यांना शुभेच्छा दिल्या. महिनाभराच्या प्रशिक्षणातून ४० महिला रिक्षा चालवू लागल्या. त्यांची परीक्षा घेऊन शिकाऊ परवाने देण्यात आले. सहा महिन्यानंतर त्यांना पक्के परवाने देण्यात येतील, असेही श्री. खरमाटे म्हणाले. 

शिकाऊ परवाने देण्याच्या कार्यक्रमात शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त वैशाली शिंदे, मोटार वाहन निरीक्षक प्रदीप इंगळे, अर्चना घाणेगावकर, मार्कंडेय फाउंडेशनचे अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, नगरसेविका आणि सप्तश्रंृगी महिला मंडळाच्या अध्यक्षा रामेश्वरी बिर्रू आदी उपस्थित होते. आनंद बिर्रू यांनी सूत्रसंचालन केले. श्रीनिवास कामूर्ती यांनी आभार मानले. 

गुलाबी रंगाच्या रिक्षा 
महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा असून, त्याचा रंग गुलाबी असणार आहे. पुरुष रिक्षाचालकांच्या अंगावर जसा खाकी रंगाचा गणवेश तसाच गणवेश महिलांना असून, तो गुलाबी रंगाचा असेल. त्यांची सेवा प्रामुख्याने महिलांनाच मिळेल. सुरक्षित वाहतूक म्हणून त्याकडे पाहण्यात येणार आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...