आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीच्या २२ वर्षाच्या तरुणाने लिहिलेल्या कादंबरीवर साकारतोय चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अवघ्या२२ व्या वर्षी महाविद्यालयीन जीवनातील भावनांचे विश्व रेखाटलेल्या बार्शीच्या सागर कळसाईत याच्या कॉलेज गेट या कादंबरीवर चित्रपट साकारतोय. महाविद्यालयीन जीवनात घडलेले काही प्रसंग आणि घटनांवर अाधारित असलेल्या सत्यकथेचे रूपेरी पडद्यावर वेगळे रूप सोलापूरकरांसहित संपूर्ण महाराष्ट्राला लवकरच पाहावयास मिळणार आहे.

पिपाणी चित्रपटाचे निर्माते बाबूराव भोर यांनी या चित्रपट निर्मिती करण्याचे निश्चित केले असून येत्या काही दिवसात हा चित्रपट तयार होणार आहे. त्यासाठी संवाद लिहिण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लगेचच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरू होणार आहे. यात एखाद्या युवा दिग्दर्शकाला संधी देऊन चित्रपट तयार करण्याचा निर्णय आहे.

महाविद्यालयीन जीवनातील भावविश्व उलगडणाऱ्या दुनियादारी चित्रपट चांगलाच चालला. त्यानंतर आलेला अादित्य सरपोतदार यांचा क्लासमेट चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडले. तसेच कथानक सागरने कादंबरीत मांडले आहे. बार्शीत सामान्य कुटंुबात जन्माला आलेला सागर हा प्रचंड कष्टाळू आणि प्रामाणिक मुलगा. त्याने कष्टातून पुण्यात एम. एम. महाविद्यालयातून एमबीएचे शिक्षण घेतले. या कॉलेज जीवनावर अाधारित कॉलेज गेट ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी इतकी गाजली की त्याची पाचवी आवृत्ती निघाली. भोर यांना ही कथा इतकी भावली की त्यांनी या कादंबरीवर चित्रपट तयार करण्याचे सागरला सांगितले.

आजच्या युवकांना संधी देणे गरजेचे
आजचे युवक हे उत्तम लिहितात दर्जेदार दिले की वाचकही वाचतात. त्याप्रमाणे सागरचे लेखन होते. तो आमच्याकडे आला तेव्हा २२ वर्षांचा होता. मात्र त्याच्या लेखणीत जादू होती. त्याने उत्तम कथा लिहिली आहे. आजच्या युवा पिढीत गुणवत्ता आहे. केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. घनश्यामपाटील, संपादक, चपराक प्रकाशन

‘चपराक’ने संधी दिल्याने मिळाले यश
आमच्याघरात लिखाणाची परंपरा नाही. कॉलेज गेट च्या पुस्तकांतून कॉलेजमधील काही आठवणीबाबत प्रथमच लिहिले. ते प्रकाशित व्हावे म्हणून काही प्रकाशकांच्याकडे गेला. पण, कुणीही दाद देत नव्हते. घनश्याम दादांनी मला संधी दिली. भोर ते लोकांपर्यंत नेत आहेत. आता माझी दुसरी कादंबरी लायब्ररी फ्रेंड ही चपराकने प्रकाशित केली आहे. सागरकळसाईत, लेखक

चपराक प्रकाशनने दिली सागरला संधी
सागरने कॉलेज गेटच्या प्रकाशनासाठी अनेक प्रकाशकाकडे पायपीट केली. सागरचे वय पाहता त्याच्या लिखाणावर कुणीही विश्वास ठेवला नाही. तू आधी मोठा हो, मग बघू, असे सांगून अनेकांनी धुत्कारले. तेव्हा चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील यांनी सागरचे लेखन वाचन केले. ते त्यांना प्रचंड आवडले. त्याचे प्रकाशन करून ती अनेक युवकांपर्यंत पाेहोचवली.
बातम्या आणखी आहेत...