आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा शाळेत आता ई - टीचिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी इंग्रजी आवश्यकच आहे. पण त्यासाठी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण आवश्यक आहे असे नाही. शिक्षणाचा दर्जा चांगला असेल तर मातृभाषेतून दिलेले शिक्षणच अधिक प्रभावी ठरते. डीव्हीडीच्या माध्यमातून मनपा प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना शिक्षण देण्यात येणार आहे. गांधी मेमोरियल लायब्ररीच्या सहकार्याने महापालिका शाळेत टीच पद्धतीचा वापर करणार असल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे आणि गांधी मेमोरियलचे उपेंद्र ठकार यांनी सांगितले.

मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे. जपान, फ्रान्स, जर्मनी, स्पेन या देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. परंतु पुढील शिक्षणासाठी इंग्रजी आवश्यक असते. गरीब विद्यार्थी इंग्रजी शिक्षण घेऊ शकत नाही. या सर्व बाबींवर टाटा इन्ट्रॅक्टीव्ह कंपनी टेक महिंद्राच्या सहकार्याने महापालिका प्राथमिक शाळेत पहिली दुसरी शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांना डीव्हीडीच्या माध्यमातून शिक्षण देणार आहे. शिक्षणाची पद्धत अतिशय सोपी अाहे. याचा फायदा शहरातील महापालिकेच्या ५९ शाळेतील चार हजार ७५० विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी सांगितले.

गुणवत्ता वाढेल
अत्याधुनिकपद्धतीने शिक्षण दिल्यास मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल. यापुढील काळात शहरातील बालवाडीत हे शिक्षण देण्याचा विचार आहे, अशी माहिती मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी कांबळे यांनी दिले. यावेळी शिक्षण मंडळाचे उपसभापती गोवर्धन कमटम, सदस्य दत्तात्रय गणपा, सुरेश कासार, गांधी मेमोरियलचे बी. जे. कुलकर्णी, प्रकाश शहा उपस्थित होते.

१६ जुलै रोजी डीव्हीडी वाटप
मनपाच्या५९ शाळेत डीव्हीडी देण्यात येणार आहे. १६ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लष्कर येथील कॅम्प शाळेत डीव्हीडी वितरणाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ठकार यांनी दिली.

शिक्षकांनाप्रशिक्षण
डीव्हीडीतकाय आहे, त्यातील अभ्यासक्रम, त्याची हाताळणी, अडचण आल्यास काय करावे आदी बाबींचे प्रशिक्षण सोमवारी ५९ शाळेच्या शिक्षकांना देण्यात आले. गांधी मेमोरियल लायब्ररीचे मनीष धिमान यांनी प्रशिक्षण दिले.