आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारीच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन, प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- सावकारांकडून वाढत्या पिळवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी उस्मानाबादेत स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहे. यावर सावकाराकडून होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रार करता येईल. उस्मानाबादेत हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून त्यानंतर तो सावकारीच्या घटना असलेल्या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उस्मानाबादेत दिली.

कळंब तालुक्यातील भाटशीरपुरा येथे एका महिला ग्रामपंचायत सदस्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या कुटुंबाची गुरुवारी (दि. १) गृह राज्यमंत्री केसरकर यांनी भेट घेतली. त्यानंतर पोलिस मुख्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. केसरकर म्हणाले, सावकारी प्रकरणात शासन कारवाईच्या बडग्याबरोबरच दुसरीकडे शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठीही विशेष धोरण आखत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळून आत्महत्या तसेच सावकाराकडे जाण्याच्या प्रकार कमी होईल, असे सांगितले. कोपर्डीप्रकरणी बोलताना या घटनेनंतर मी तेथे गेलो होतो. प्रकरणात चार्जशीट दाखल होऊन आरोपींना फासावर लटकाविण्यासाठी गृह विभाग प्रयत्नशील आहे. इसिसच्या नावाखाली एटीएस अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप चुकीचा अाहे. आपल्या येथील तरुण या संघटनेच्या संपर्कात येऊन चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत यासाठी शासन प्रयत्न करत आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर काही कॉमेंट नाही, असेही ते म्हणाले.

गणपतीनंतर कारवाईला वेग
सध्यापोलिस दलावर गणपतीच्या बंदोबस्ताचा ताण आहे. गणपतीनंतर नवरात्रोत्सवापूर्वी अवैध धंद्याबरोबरच सामाजिक हितास बाधा आणणाऱ्या सर्वांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवानंतर चित्र बदललेले दिसेल, असेही केसरकर म्हणाले.

सोनोग्राफीसेंटरवरील तपासणीसाठी स्टँडर्ड प्रोटोकॉल-आरोग्यमंत्री सावंत
रेडिओलॉजिस्टनीगुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यावर आराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांना विचारले असता त्यांनी काही मोजक्या डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टरांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. गर्भलिंग निदान कायद्यात बदलाचा अधिकार राज्याला नाही. परंतु या कायद्याचा आधार घेऊन रेडिओलॉजिस्टना त्रास देण्याचा, वेठीस धरण्याचा प्रकार रोखण्यासाठी राज्य शासन १५ दिपसांत एक स्टँडर्ड प्रोटोकॉल तयार करून रेडिओलॉजिस्टना देणार आहे.

साहेब, आईचा काय दोष?
आमचीआई वनमाला हिने खासगी सावकारांच्या जाचामुळे आत्महत्या केली आहे. सावकार जाच करत असताना कधी कोणत्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. जाच होणारा अपमान सहन झाल्यामुळे आत्महत्या केली आहे. यामध्ये माझ्या आईचा काय दोष होता? या सावकारांमुळे माझ्या आईला जीवन संपवण्याचे पाऊल उचलावे लागले आहे. त्यामुळे यातील आरोपींना कडक शासन करावे, अशी मागणी वनमाला यांच्या कन्या प्रतिभा शेळके यांनी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. प्रतिभा यांनी सावकारांच्या छळाचा पाढाच वाचला. त्या म्हणाल्या, सावकारांनी आमची जमीन हडप केलीच, उलट जाच होत असल्यामुळे आईनेसुद्धा विष पिऊन आत्महत्या केली. हे सावकार गुन्हेगारी वृत्तीचे असून त्यांच्यापासून आमच्या कुुटुंबीयांच्या जीवितास धोका आहे. मायबाप सरकार, आता तुम्हीच आम्हाला वाचवा.
बातम्या आणखी आहेत...