आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद, लातूरला आता रेल्वेने पाणी, शेतकऱ्यांना डावलणाऱ्या बँकांचे आता लाड नकोत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- मराठवाड्यात पावसाअभावी भयानक दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. प्रकल्पांमध्येही पाणीसाठा नाही. संपूर्ण मराठवाड्यात ऐन पावसाळ्यात ११०० टँकर सुरू आहेत. धरणात १५ दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. विशेषत: उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यात रेल्वेने पाणीपुरवठा करण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय झाला असून, रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरी मागितली आहे, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

रविवारी (दि.१६) जिल्ह्यातील दुष्काळी भागाची लोणीकर यांनी पाहणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, दुष्काळी दौऱ्यावर आल्यानंतर विदारक चित्र पहायला मिळाले. पहिली पेरणी पावसाअभावी वाया गेल्यानंतर दुसरी केली, परंतु, ही पेरणीही वाया गेली. काही भागात तर पावसाअभावी पेरणीच झाली नाही. पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील भूगर्भाची पाणीपातळी खलावली आहे. ४०० ते १००० फुटापर्यंतही पाणी उपलब्ध होत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात टंचाईची प्रचंड तीव्रता जाणवत आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रीत काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी काही दिवसात आपण येणार असून त्यावेळी जुनेच प्रश्न समोर आल्यास कारवाईचा इशारा दिला.

भावनिक आवाहन अन् कारवाईचा इशारा
पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी प्रत्येक विषयाच्या मुळाशी जाऊन चर्चा केली. दुष्काळग्रस्त भागात शासकीय उपाययोजना पोहोचण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना कधी भावनिक आवाहन केले तर कधी कारवाईचा इशारा दिला. शेतकरी हे आपले आई-बाप समजून त्यांची मदत करा, असे आवाहन केले. तसेच जे अधिकारी स्वत: होऊन काम करतील, त्यांचे प्रमोशन करण्यात येईल आणि कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा इशाराही दिला. तसेच दुष्काळ निवारणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.

दुष्काळाशी एकत्रित लढा
शेतकऱ्यांची भेट
पारगाव,वाशी, इंदापूर, तांदुळवाडी, पारधी वस्ती- तेरखडा, येरमाळा आणि गडदेवदरी येथील पाणी चाराटंचाई भागातील पाहणी लोणीकर यांनी केली. यावेळी शेकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांपर्यंतपोहोचा
अधिकाऱ्यांनीशेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करावी, उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी आढावा बैठकीत केले.

राज्यासाठी "अटल' पाणीपुरवठा योजना
दुष्काळग्रस्तांसाठीयापूर्वी विविध खात्यांतर्गत अनेक योजना राबवण्यात आल्या. परंतु भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, या योजना राबवण्यात आल्या. अनेक टिकाणी योजना वर्षानुवर्षे अपूर्ण आहेत. योजनांची संख्या जास्त असल्याने कोणती योजना कोणत्या विभागाची आहे, याबाबत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचीही गफलत होते. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने एकच "अटल' पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. यावर केंद्रासह राज्यशासनाच्या वतीने खर्च करण्यात येईल, अशी माहितीही लोणीकर यांनी दिली.

१५ दिवस पुरेल एवढेच पाणी
मराठवाड्यातपंधरा दिवस पुरेल एवढेच पिण्याचे पाणी शिल्लक आहे. यावर मात करण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू आहे. रेल्वेने पाणी आणल्यास वििहरींमध्ये टाकून तसेच टँकरद्वारे टंचाईग्रस्त भागाला पुरवण्यात येईल, असेही लोणीकर म्हणाले.

वाहून जाणारे पाणी आडवा
मराठवाड्यातपडलेल्या पावसाचे पाणी पुढे आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये वाहून जाते. प्रकल्प अपूर्ण असल्याने पाणी अडवले जात नाही. त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी टंचाईला तोंड द्यावे लागते. वाहून जाणारे पाणी गावातच अडवल्यास याचा निश्चितच फायदा होईल. त्यामुळे अपूर्ण प्रकल्पांना निधी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. दरम्यान, प्रकल्पाला पाणी देणाऱ्या २६ हजार शेतकऱ्यांचा मावेजा ते १७ वर्षांपासून त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे विविध न्यायालयात प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचे पैसे देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली.

राज्यावर सुमारे लाख ८६ हजार रुपयांचे कर्ज आहे. परंतु, दुष्काळी उपाययोजनांसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. कायम दुष्काळी स्थिती असणाऱ्या मराठवाड्यातील प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. पाणीसाठा करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याबाबतही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

कृषी पंपांना वर्षात वीज जोडणी द्या
सध्याज्या शेतकऱ्यांनी विविध योजनांखाली विहिरी पूर्ण केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांकडून मागणी नोंदवून महावितरणने त्यांना कृषी पंपासाठी वीजजोडणी द्यावी. एका वर्षांत कृषी पंप असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात साडेसात हजारांवर कृषी पंपांची वीज जोडणी अद्याप देणे बाकी असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता अरुण पापडकर यांनी सांगितले.

आठ दिवसांत अभियंत्याची नेमणूक
भीषणटंचाई असताना येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता नसल्याने अन्य अभियंत्याकडे पदभार सोपवला आहे, याबाबत पत्रकारांनी विचारले असता. येत्या आठ दिवसांत कार्यकारी अभियंतापदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल.
शेतकऱ्यांना डावलणाऱ्या बँकांचे आता लाड नकोत
बँकांचीस्थापना होत असताना रिझर्व्ह बँकेसह सरकाशी बँक करार करते. त्यानुसार संकटकाळात राज्याला नागरिकांना मदत करणे बँकावर बंधनकारक आहे. परंतु, अनेक राष्ट्रीयीकृत बँका स्थिरस्थावर झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास चालढकल करतात. असे प्रकार यापुढे चालणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
यापुढे शेतकऱ्यांना पीककर्ज देणाऱ्या बँकांचे लाड त्या बँकांचे परवाने रद्द करण्याबाबतची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे करावी, त्यानंतर आम्ही बघून घेऊ, अशा शब्दांत राष्ट्रीयीकृत बँकांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन समिती सभागृहात लोणीकर यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार राहुल मोटे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, डॉ. प्रशांत नारनवरे, नितीन काळे आदी उपस्थित होते.