आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतिमान एक्स्प्रेसनंतर ‘टॅल्गो ट्रेन’चे वेध, स्पेनची रेल्वे कंपनी करणार मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिल्ली-आग्रा ताशी १६० किमी वेगाने गतिमान एक्सप्रेस धावल्यानंतर भारतीय रेल्वेला अधिक गतिमान होण्याचे वेध लागले आहेत. स्पेनची रेल्वे कंपनी भारतात तीन मार्गांवर ताशी २०० किमी वेगाने धावणाऱ्या टॅल्गो रेल्वे सुरू करण्याच्या विचारात आहे.
वजनाने हलके व अत्याधुनिक डबे या रेल्वेस असतील. त्यामुळे वेग ताशी २०० किमी असेल. २७ मार्चला स्पेनहून जहाजाद्वारे ९ डबे मुंबईसाठी रवाना झाले असून २१ एप्रिलला मुंबईत पोहाेचतील.
डबे दाखल झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली मार्गावर ताशी २०० च्या वेगाने टॅल्गोची चाचणी होईल, असे असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. टॅल्गो कंपनी अनेक वर्षांपासून भारतात उतरण्यासाठी उत्सुक होती. रेल्वे मंत्रालयाकडून होकार मिळाल्यानंतर देशात तीन ठिकाणी या रेल्वेची चाचणी होईल. यात बरेली ते मुरादाबाद, पलवाल ते मथुरा व मुंबई ते दिल्ली अशा मार्गांचा समावेश आहे. बरेली ते मुरादाबाद ११५ किमीच्या वेगाची, पलवाल ते मथुरादरम्यान १८० किमी तर मुंबई ते दिल्ली दरम्यान २०० किमी वेगाची चाचणी होईल. भारतात येणारी टॅल्गो रेल्वे विजेऐवजी डिझेल इंजिनवर धावणार आहे. सध्या मुंबई ते दिल्लीदरम्यान राजधानी एक्स्प्रेसला १२ तासांचा अवधी लागतो. टॅल्गो रेल्वे अवघ्या सात तासांतच हे अंतर कापेल.