आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारांना मिळणार आता ‘कौशल्य विकास उद्यमिता’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बेरोजगारांसाठी ऑगस्टमध्ये ‘कौशल्य विकास उद्यमिता अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. कौशल्य विकास उद्योजकता विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयातून ही मोहीम हाती घेण्यात आली.

स्वत: जिल्हाधिकारी यात सहभागी होतील. तालुकानिहाय कार्यशाळा घेऊन बेरोजगारांची निवड करण्यात येईल. त्यानंतर संबंधितांना राज्यातील नामांकित कंपन्यांमध्ये प्रशिक्षण मिळेल. त्यानंतर त्याची क्षमता पाहून रोजगार देण्याचा हा कार्यक्रम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासावर मोठा भर दिला आहे. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत राज्य सरकारने ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा दिला. राज्यात गुंतवणूक वाढावी, उद्योग उभारणीच्या परवान्यांचे सुसूत्रीकरण, कुशल मनुष्यबळ आदींकडे लक्ष वेधण्यात आले. विशेष म्हणजे रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे रूपांतर ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग’ असे करण्यात आले. त्याला जिल्हा उद्योग केंद्राची जोड देण्यात आली. या दोहोंच्या समन्वयातून ही मोहीम सुरू होईल.

यासाठी काही अटी
१.पाचवीपासून पदवीधर उमेदवार या अभियानात सहभागी होऊ शकतात
२. वयाची अट १८ ते ३५ आहे. इतर कुठल्याही अटी प्रशिक्षणासाठी नाहीत
संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी उमेदवाराला संबंधित कंपन्यांमध्ये जावे लागेल
सहभागी होणाऱ्याला प्रवेश अर्जावर पसंतीचा व्यवसाय निवडता येणार आहे.
कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी तालुकानिहाय कार्यशाळा घेण्यात येतील
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी बैठकांमधून ४२ व्यवसाय अभ्यासक्रम निवडले

बड्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण
कौशल्यमार्गदर्शनासाठी राज्यातील नामांकित कंपन्या निवडण्यात आल्या आहेत. बहुतांश प्रशिक्षण निवासी आहे, तर काही अर्धनिवासी. ४२ व्यवसायातून पसंतीचा व्यवसाय निवडून यात सहभागी होता येते. साधारण ऑगस्टमध्ये या अभियानास सुरुवात होईल.” संभाजीडगळे, संचालक, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग

‘डीआयसी’ सहभागी
कौशल्यविकास आणि उद्यमिता अभियानात उमेदवाराचा कल पाहण्यात येणार आहे. त्याने निवडलेल्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती देण्यासाठी त्याला प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष रोजगार किंवा प्रत्यक्ष व्यवसायाची उभारणी याबाबत जिल्हा उद्योग केंद्र त्याला साहाय्य करणार आहे.” राजशेखरशिंदे, समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
बातम्या आणखी आहेत...