आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेल्वे तिकिटांवर येणार बारकोडिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - काही ठिकाणी रेल्वेची आरक्षित आणि सर्वसाधारण तिकिटे बनावट आढळून आली. परिणामी रेल्वेच्या प्रतिमेला मोठा तडा गेला. बनावट तिकिटे तयार करता येऊ नयेत अथवा केल्यास तत्काळ त्याचा शोध लागावा, या हेतूने रेल्वे मंत्रालय आता आरक्षण केंद्रावरून मिळणाऱ्या तिकिटासोबत, सर्वासाधारण दर्जाचे तिकीट तिकिटावर बारकोडिंग करण्याच्या विचारात आहे. येत्या काही दिवसांत उत्तर रेल्वे झोन बारकोड संदर्भातला पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. त्यानंतर मध्य रेल्वेसह अन्य झोनमध्ये टप्प्याटप्प्याने हे लागू केले जाईल.

रेल्वेच्या क्रिस या संस्थेकडून हे सॉप्टवेअर बनवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. बारकोड तपासण्यासाठी तिकीट पर्यवेक्षकांना स्वाइप मशीन देण्यात येणार आहे. यामुळे तिकिटातील माहिती तिकीट अधिकृत आहे की नाही हे समजणार आहे. केवळ रेल्वे गाडीतील तिकीट पर्यवेक्षकच नाही तर स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभे असलेल्या तिकीट निरीक्षकांनाही हे मशीन देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानकावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटाची दुसऱ्यांदा तपासणी होणार आहे. यामुळे अवैध तिकिटांच्या प्रकारला आळा बसेल असा रेल्वेचा दावा आहे.

^तिकिटावर बारकोड पद्धत सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. उत्तर रेल्वेत याचा पायलट प्रोजेक्ट सुरू होत आहे. यामुळे अनधिकृत तिकिटांना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.'' मनिंदरसिंग उप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर