उमरगा- दुष्काळजन्यस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रतिमाणसी दोन रुपये किलो गहू तीन रुपये किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांची जबाबदारी आहे की त्यांनी सर्व लाभार्थीपर्यंत धान्य पोहोचवावे असे मत उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील येळी येथे शनिवारी (दि.१५) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्य वाटपाचा शुभारंभ आमदार चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार यू. व्ही. सबनीस हे होते.
यावेळी आमदार चौगुले म्हणाले, सद्यस्थितीत पाऊस पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्य शासनाकडून दुष्काळमुक्तीसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. कार्यक्रमासाठी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एम. ए. सुलतान, टी. एल. चव्हाण, नंदकुमार जोशी, बी. पी. गायकवाड, आर. आय. केलुरकर, बाबूराव शहापुरे, सुधाकर पाटील, मंडळ अधिकारी पी.ए.पाटील, तलाठी एस.जी.गोस्वामी, सरपंच निवृत्ती पवार, उपसरपंच सुनंदा रेड्डी, सूर्यकांत माळी आदींची उपस्थिती होती.
वाशी येथे कार्यक्रम
तालुक्यातीलशेतकऱ्यांसाठी तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते धान्यवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, यांची उपस्थिती होती. यावेळी डोके यांनी या योजनेबाबत सर्वांना माहिती सांगीतली. कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, अव्वल कारकून डी. जी. शिंदे, लिपिक सी. के. बारटक्के, सयाजी नाईकवाडी, माजी उपसरपंच नागनाथ नाईकवाडी, स्वस्त दुकानदार संघटनेचे बाळासाहेब सुकाळे, अलीम काझी उपस्थिती होती.
७२ हजार नागरिकांसाठी होणार फायदा
दुष्काळीस्थितीमुळे शेतकऱ्यांसाठी धान्य वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेतंर्गत तालुक्यातील २५ हजार ९६१ शिधापत्रिकेवरील ७१ हजार ७१८ नागरिकांना दोन हजार १५४ क्विंटल गहू, तर एक हजार ४३६ क्विंटल तांदूळ वाटप केले जाणार आहे.'' उत्तमरावसबनीस, तहसीलदार