आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - मंद्रूपमधील विकासकामांचे निवेदन देण्यास आल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन तालुका एनएसयूआयने निषेध केला. पाणीपुरवठा इतर विकास कामे केली नाही तर आंदोलनाचा इशारा तालुकाध्यक्ष अनंत म्हेत्रे यांनी दिला.
एनएसयूआयचे अध्यक्ष अनंत म्हेत्रे यांच्या नेतृत्वात विविध समस्यांचे निवदेन देण्यास दुपारी कार्यकर्ते ग्रामपंचायतमध्ये आले होते. पण कार्यालयात सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक कोणच नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी तासभर कार्यालयात ठिय्या मारला. एक तासाने ग्रामसेवक दयानंद पाटील आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून निषेध व्यक्त केला त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

पाणीपुरवठा, सिमेंट रस्ते, हद्दवाढ भागात पथदिवे बसवावेत, बाजार चौकातील अतिक्रमण काढावे, इंदिरा नगर प्राथमिक शाळेला संरक्षक भिंत बांधावे, स्मशानभूमीची कामे, नवीन बसस्थानकासाठी पाठपुरावा करावा, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी गणेश वाघमोडे, महेश साेनवणे, मल्लिकार्जुन स्वामी, बबलू शेख, ओंकार माळी, सोमनाथ फडतरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

८० लाख थकबाकी
^गावातील घरपट्टीपाणीपट्टीचे ८० लाख रुपये थकीत आहेत. अगोदर ही थकबाकी भरली तर कामे करता येतील. महिन्याला सव्वा लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या पगार करावा लागतो. जसजशी वसुली होईल तशी आम्ही कामे करू. सरपंच उपसरपंच मल्लिकार्जुन मंदिराच्या कार्यक्रमात असल्याने मी निवेदन स्वीकारले.” दयानंद पाटील, ग्रामसेवक

^गावाचे प्रश्नविकासकामांचे निवेदन देण्यास आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो. सरपंचांना बोलावले पण ते आले नाहीत. तासभर आम्ही त्यांची वाट पाहिली. त्यामुळेच त्यांचा निषेध केला.” अनंत म्हेत्रे, तालुकाध्यक्ष,एनएसयूआय

^एनएसयूआयचा हाराजकीय स्टंट आहे. यापूर्वी त्यांची तीन वर्षे सत्ता होती. त्यांनी त्या काळात काय काम केले? आम्ही योग्य रीतीने कारभार करीत आहोत. आंदोलनासाठी ते येणार आहेत याची आम्हाला कल्पना नव्हती.” रमेश नवले, उपसरपंच,मंद्रूप ग्रामपंचायत