आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनटीपीसी अपघात; दोन कंपन्यांच्या ठेकेदारांवर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - होटगी-फताटेवाडीयेथील एनटीपीसीमध्ये बाॅयलरचे लोखंडी अँगल बसवताना ते कोसळून शुक्रवारी सकाळी तीन मजूर मरण पावले होते. या घटनेला जबाबदार धरून अँगलचे काम करणाऱ्या दोन कंपन्यांच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाला अाहे. परंतु, ठेकेदारांची नावे अद्याप पोलिसांकडे अाली नाहीत. अपघात कसा झाला, जबाबदार कोण, ठेकेदार कोण, याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमल्याचे वळसंग ठाण्याचे सहायक निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांनी दिली.
पाॅवर मेक एलअारसी कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात अाली अाहे. त्या कंपनीचे ठेकेदार कोण हे समोर यायचे अाहे. दलबरसिंग संधू (वय २२, रा. जिल्हा - तरंताल, पंजाब) यांनी वळसंग पोलिसात तक्रार दिली अाहे. गुरूप्रीत प्रतापसिंग संधू (वय २४, रा. लोहारा का, खडुसा, तरंताल), राजवीर सुवर्णसिंग (वय २४, रा. मुंडपिंड, खुडसा), गुरूसेवक महेंद्रसिंग (वय १९, रा. लोहारा, खडुसा, पंजाब) या तिघांचा मृत्यू झाला अाहे. अँगल क्रेनच्या साह्याने नेताना तो खाली कोसळल्याने अपघात झाला होता.

सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली नाही. निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. दोन कंपनीचे संबंधित ठेकेदार कोण अाहेत. या अपघाताला जबाबदार कोण अाहे, याची माहिती मागवली अाहे. बाॅयलर निरीक्षक, कामगार अायुक्त यांच्याकडून अभिप्राय घेऊन लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे श्री. सोनकांबळे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...