आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनटीपीसी जलवाहिनी पूर्ण करण्यास मार्चअखेर मुदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्याय म्हणून एनटीपीसी जलवाहिनी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानुसार एनटीपीसी जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. बुधवारी विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत एनटीपीसी जलवाहिनी मार्चअखेरला पूर्ण होईल आणि एप्रिलमध्ये चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती एनटीपीसी अधिकाऱ्यांनी दिली. पंपिंगसाठी महावितरणचे कनेक्शन त्वरित देऊन लवकरात लवकर यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त चोक्कलिंगम यांनी जलवाहिनीच्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेतली. तसेच सदरचे काम त्वरित पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. याबाबत महापौर पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले.

पैसे भरल्याशिवाय पाणी मिळणार नाही...
विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मनपा आयुक्त नसल्याने सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. महापालिकेने कोटी रुपये भरणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र कोटीच जमा केले. उर्वरित कोटी भरल्याशिवाय एप्रिलचे आवर्तन सोडता येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. पुणे येथील बैठकीत मनपा आयुक्तांनी थकीत रकमेपोटी कोटी भरल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. परंतु, बैठकीस मनपा आयुक्त नसल्याने यासंबंधी पुढील बैठकीत चर्चा करू असे ठरले.
बातम्या आणखी आहेत...