आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एनटीपीसी’साठी होटगी रेल्वे स्थानकावरील यार्डचे रिमोल्डिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या प्रकल्पांसाठी होटगी स्थानकावरील यार्ड रिमोल्डिंगच्या कामास येत्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे. याला सुमारे २४ कोटी रुपये खर्च येणार आहे.
यार्ड रिमाेल्ड केल्यामुळे होटगी स्थानकावर महत्वपूर्ण बदल होतील.याचा परिणाम रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी होणार आहे.
एनटीपीसीचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर रेल्वे स्थानकावरून रोज १२ मालगाड्या धावतील. मालगाड्यांची संख्या वाढणार असल्याने याचा परिणाम प्रवासीगाड्याच्या वेळेवर होण्याची शक्यता आहे. त्यांना विलंब होऊ नये, क्रॉसिंगसाठी थांबावे लागू नये यासाठी रेल्वे प्रशासन यार्डचे रिमोल्डिंग करणार आहे. येत्या काही दिवसांत कामास सुरुवात होऊन महिन्या अखेरीस रिमोल्डिंगचे पूर्ण काम होणार आहे. विक्रमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेने जय्यत तयारी केली आहे.

यार्ड रिमोल्डिंगमध्ये नेमके काय होणार
होटगीते एनटीपीसीसाठी स्वतंत्र स्लायडिंग टाकण्यात येणार आहे.यामुळे मालगाड्या थेट प्रकल्पात जातील. तेथे एकूण १० स्लायडिंग असणार आहेत. सुमारे २० िकमीचे हे स्लायडिंग असेल. स्थानकावरील दोन्ही बाजूचे टर्न आऊट बदलण्यात येईल. सध्या स्थानकावर दोन लाइन आहेत. रिमोल्डिंग करताना आणखी दोन अतिरिक्त रेल्वे रुळ टाकण्यात येतील. सिग्नल यंत्रणेची जागा बदलण्यात येईल.

प्रवासी गाड्यांचा त्रास कमी
^एनटीपीसी प्रकल्प सुरू झाल्यानंतर सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या मालगाड्याच्या संख्येत वाढ होईल. मालगाड्यामुळे प्रवासी गाड्याच्या वेळेवर कोणताही विपरित परिणाम होऊ नये म्हणून यार्ड रिमोल्डिंग केले जाणार आहे.” मनिंदर सिंगउप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...