आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोषण आहार फसवणूकप्रकरणी सपाटेंसह संबंधितांची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक शाळा या संस्थेत शालेय पोषण अाहार याेजनेअंतर्गत तांदूळ इतर धान्य विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वाटप करण्यात येत होता. मात्र मुलांची खोटी संख्या दाखवून आलेला अधिक तांदूळ खुल्या बाजारात विकल्याची तक्रार यल्लूबाई राजेंद्र कोळी यांनी थेट न्यायालयात केली. याप्रकरणी न्यायाधीश एस. एस. पानसरे यांनी मनोहर सपाटे यांच्यासह अन्य संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश दिले.
पोषण अाहार योजनेअंतर्गत या शाळेने २०१२ ते २०१५ या काळात शालेय पोषण अाहाराचे टेंडर यल्लूबाई कोळी यांना दिले होते. तेव्हा विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कोळी या विद्यार्थ्यांना भात करून देत होत्या. यादरम्यान कोळी यांच्या निदर्शनास एक बाब आली. ती म्हणजे शाळेचे माजी मुख्याध्यापक तानाजी भगवान बाबर, मुख्याध्यापक विजया बाबूराव पाटील, कुंदा वसंत यादव, कर्मचारी श्रीमंत नागनाथ मुद्दे, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका महानंदा चन्नबसवेश्वर सोलापुरे यांनी शासनाचा अतिरिक्त तांदूळ साठा जमा करून ठेवला आहे. हा साठा विद्यार्थ्यांची संख्या खोटी दाखवून घेण्यात आला होता. ही बाब निदर्शनास येताच कोळी यांनी मनोहर सपाटे यांना याबाबत सांगितले. कोळी यांच्या लक्षात आले की सपाटे यांच्याच सांगण्यावरून हा प्रकार सुरू अाहे. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र त्यांनी दाखल करून घेतली नाही. म्हणून कोळी यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. यावर न्यायालयाने या प्रकरणात सपाटे यांच्यासह संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश फौजदार चावडी पोलिस ठाण्यास दिले आहेत. याप्रकरणी फिर्यादीकडून अॅड. डी.एन. भडंगे अॅड. एन. एन. भडंगे हे काम पाहात आहेत.

माझा काहीही संबंध नाही, राजकीय कट
^शालेय पोषण आहाराच्या घोटाळ्यासंदर्भात मला काही माहीत नाही आणि माझा काही संबंध नाही. यापूर्वी या प्रकरणाची चौकशी झाली आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय द्वेषापोटी स्वपक्षीयांकडून विनाकारण माझे नाव गोवण्यात येत आहे. पोलिस याची निश्चित चौकशी करतील.” मनोहर सपाटे, नगरसेवक
बातम्या आणखी आहेत...